येरवडा क्षेत्रिय कार्यालयात हालचाल नोंदवहि कोरि मनसेच्या वतीने कारवाईची मागणी.
येरवडा : येरवडा क्षेत्रिय कार्यालयात दिनांक ८ जुलै २०२५ रोजी अनेक अधिकारी,कर्मचारी उपस्थित नसताना हालचाल नोंदवही कोरी असल्याचे आढळले. संबधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी परिमंडळ १ चे उपायुक्त माधव जगताप यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहर सचिव रमेश जाधव यांनी निवेदन देऊन केली.
शासकीय कार्यालयांमध्ये ‘हालचाल रजिस्टर’ (Movement Register) ठेवून अधिकारी,कर्मचारी त्यांच्या जागेवरून इतर कामासाठी जाताना हालचाल नोंदवहीत नोंद करणे बंधनकारक असताना महानगरपालिकेच्या येरवडा क्षेत्रिय कार्यालयात अनेक वेळा नोंदच केली गेली नाही दिनांक ८/७/२०२५ रोजी अनेक अधिकारी,कर्मचारी कार्यालयात उपस्थित नव्हते. दुपारी ११:५३ वाजता हालचाल नोंदवही पाहिली असता एकही नोंद आढळली नाही.
अधिकारी, इतर कर्मचारी कार्यालयीन वेळेत अनेकदा भेटत नाहीत. इतर कर्मचाऱ्यांकडून ते बैठकीला गेले आहेत, पाहणीसाठी गेले आहेत अशी कारणे सांगितली जातात, संबंधित अधिकाऱ्याशी मोबाइलवरून संपर्क साधल्यास प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जात असून अधिकारी कामाच्या बहाण्याने जातात कुठे, असा प्रश्न उपस्थित होतो.