येरवडा येथील हॉट मिक्स प्लांट (डांबर प्लांट) टाळा ठोको आंदोलन
पुणे शहर कॉंग्रेस कमिटी वडगावशेरी विधानसभा मतदार संघाच्या वतीने आंदोलन
पुणे : येरवडा येथील हॉट मिक्स प्लांट (डांबर प्लांट) मुळे मोठयाप्रमाणात प्रदुषण होते आहे. त्यामुळे येरवडा भागातील विशेषतः लक्ष्मीनगर भागातील नागरिकांना श्वसनाचा आजार झाले आहेत. क्षयरोग (टिबी) , दमा, कर्करोग (कॅन्सर) असे होण्याचे आजार होण्याची शक्यता अधिक आहे. अनेकामधे श्वसनाचा आजार वाढले आहेत. त्यामुळे पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्त व मुख्य अभियंता (पथ विभाग) यांना निवेदन द्वारे तक्रार करण्यात आली होती. मात्र त्यावर काही उपाययोजना न केल्यामुळे गुरूवार येरवडा ब्लॉक काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष रमेश सकट यांच्या नेतृत्वाखाली हॉट मिक्स प्लांट (डांबर प्लांटच्या) प्रवेशद्वाराला कुलूप लावून (टाळा ठोको ) आंदोलन करण्यात आले.
येरवडा येथील हॉट मिक्स प्लांट (डांबर प्लांट) टाळा ठोको आंदोलनास नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अरुण वाघमारे, माजी नगरसेविका आश्विनी लांडगे, ज्योती चंदेवळ, राकेश चौरे, माजी नगरसेवक संतोष आरडे, माजी नगरसेविका रेखा घलोत, विशाल मलके, अमित कांबळे, सुरेश राठोड, आनिल आहिर, डॅनियल लांडगे, विल्सन चंदेवळ, नागेश भालेराव, हसिना सय्यद, सुनील काळोखे, अमर मांडलिक, कैलास गलांडे, युसूफ शेख, दिनेश कांबळे, तारा शर्मा, गणेश मिसाळ, संजय दहिभाते, गणेश कांबळे, डॅनियल मगर, मकसूद शेख, सुनील खरे, लतेश सारंग, पप्पीसिंग सहोत्रा, मुस्तफा हानुरे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि असंख्य नागरिक सहभागी झाले होते.
हॉटमिक्स प्लांटमधून दिवसरात्र धूर बाहेर पडतो, या धुरातून पडणारी काजळी तेथील नागरिकांचा घरांरांच्या छप्परावर , टेअर्सवर मोठ्याप्रमाणात जमा झाली आहे. याचा अर्थ येथील नागरिकांचा, लहानमुलांच्या नाकातोंडात जात असणार हे उघड आहे. त्यामुळे येथील नागरिकांची आरोग्यतपासणी करून त्याचा अहवाल महापालिकेने प्रसिद्ध करावा. यामधून खरी परिस्थिती व वास्तव समोर येईल. शहरात हॉट मिक्स प्लांट उभारता येत नाही. तरीसुद्धा महापालिकेने हरित लवाद प्राधिकरण खोटी माहिती दिली आहे. त्यामुळे महापालिकेवर कारवाई करावी. हरित लवाद प्राधिकरण शहरात कचरा जाळल्यामुळे महापालिकेवर ताशेरे ओढते तर गेली अनेक वर्ष अनारोग्य पसरवणाऱ्या महापालिकेवर कारवाई का होत याचे आश्चर्य वाटते. याबाबत हरित लवाद प्राधिकरणाकडे तक्रार करणार आहे.
रमेश सकट ,अध्यक्ष येरवडा ब्लॉक काँग्रेस कमिटी