रमा माता महिला मंडळ व भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर
पुणे – येरवडा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटी रमामाचा महिला मंडळ व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा महिला विभाग यांच्या सहकार्याने उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर” झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटी सांस्कृतिक भवन या ठिकाणी आयोजित या शिबिराचे उद्घाटन पुणे शहर महिला अध्यक्ष सुनीताताई मोहन रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रमामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सुशीला कदम, सचिव रेखा चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व महिला उपासीका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने केंद्रीय शिक्षिका महानंदा डाळिंबे,सुनीता जोगदंड, स्मिता भिंगारे, सुप्रिया थोरात, सुनीता ओव्हाळ, राजश्री सरोदे, रेखा ढेकळे यांनी मार्गदर्शन केले.
या विशेष शिबिरांमध्ये महिला उपासिकांसाठी पंचांग प्रणाम, धम्म – सद् धम्म, बौद्धांचे मंगल दिन व ते का साजरे करावेत, आदर्श स्त्रीरत्न व त्यांची शिकवण, रमाई चरित्र त्यासोबतच अंधश्रद्धा या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने राज्यभर शंभर पेक्षा अधिक प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन आजवर करण्यात आलेले आहे. शिबिराच्या समारोप समारंभाला डॉ. आंबेडकर सोसायटी सांस्कृतिक भवन ट्रस्टचे संचालक विलास कदम, विलास मोरे, सामाजिक कार्यकर्ते निखिल गायकवाड उपस्थित होते. दहा दिवसीय ” उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर” यशस्वी करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटी सांस्कृतिक भवन ट्रस्ट,सिद्धार्थ मंडळ तसेच रमामाता महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य व महिला उपासिका यांचे बहुमोल सहकार्य लाभले.