रुग्णांच्या तब्येतेची देखभाल करणाऱ्या परिचारिकेंचा  सन्मान करणे हे आपले  कर्तव्यच आहे.  

Dilip KurhadeHealth11/05/2025288 Views

पुणे शहर रुग्ण सेवा समितीतर्फे फ्लोरन्स लाईट सिंगल पुरस्कार सो योगिता डामसे यांना पुणे मनपाच्या उप आरोग्य प्रमुख डॉक्टर कल्पना बळवंत मॅडम ज्येष्ठ उद्योजक माननीय कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

रुग्णांच्या तब्येतेची देखभाल करणाऱ्या परिचारिकेंचा  सन्मान करणे हे आपले  कर्तव्यच आहे.  

                                                                             – जेष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल                   

बोपोडी : डॉक्टर आणि परिचारिका आपल्या जीवाची  पर्वा न करता  रुग्णांची काळजी घेऊन  देखभाल करून  सेवा करातात हि कामगिरी फार मोठी आहे आजारी असणाऱ्या पेशंट जवळ आपले नातेवाईक सुद्धा जवळ जाण्यास घाबरतात परंतु  अशा वेळेस डॉक्टर आणि परिचारिका त्यांना जीवन दान देतात हे माझ्या दृष्टीकोनातून फार मोठी गोस्ट आहे त्यामुळे त्यांचा  सन्मान करणे हे आपले कर्तव्यच आहे असे गौरवोद्गार प्रसिध्द उद्योजक कृष्णकुमार गोयल यांनी व्यक्त केले.  पुणे शहर रुग्ण सेवा समितीतर्फे फ्लोरन्स लाईट सिंगल पुरस्कार  योगिता डामसे यांना पुणे मनपाच्या उप आरोग्य प्रमुख डॉक्टर कल्पना बळीवंत यांचा उद्योजक  कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जागतिक पारिचारिका दिनानिमित्त दरवर्षी  रुग्ण सेवा समितीच्या वतीने गेले 33 वर्ष हा पुरस्कार  देण्यात येतो. हॉस्पिटल मधील परिचारिका रुग्णांची सेवाभावी ने करतात. अशा पुणे  शहर जिल्हा  हॉस्पिटलमधील परिचारिका यांना समितीतर्फे  सन्मानचिन्ह  चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी योगिता रामभाऊ डामसे  पाषाण हॉस्पिटल यांना सन्मानित करण्यात आले. तसेच तसेच विविध रुग्णालयातील  11 परिचिका  यांना  त्यांच्या विशेष सेवेबद्दल यांना सन्मानित करण्यात आले. यापैकी  नंदा मिसाळ, संगीता ठोंबरे, रूपाली मुदगे, अलिजा बेग पिल्ले, अर्चना राजगुरू, कांता मरळ, निर्मला पुलकमवार, प्रतीक्षा कांबळे, हेमांगी गायकवाड, प्रभा पिल्ले, कल्पना चोपडे, या 11  परिचकिरांचा सन्मानचिन्ह   गुच्छ देऊन  सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र भुतडा, हे होते. यावेळी  इंद्रजीत भालेराव, प्रशांत टेके, विशाल जाधव, अनिल भिसे, अखिल मोगल, अन्वर शेख ,गणेश सार वाण, सुभाष निमकर, श्रीकांत जगताप, बाबा तांबोळी , निलेश मोरे, संदीप भिसे, विठ्ठल आरुडे, आदित्य ओव्हाळ, विजय सरोदे, अजित थेरे, विनोद सोनवणे, संतोष दिघे, विजय सोनीग्रा, सिल्वराच्या अंतोनी, राजेश माने, दत्ता सूर्यवंशी, रितेश गायकवाड, अफजल खान, तसेच महिला आघाडी  प्रमुख कार्यकर्ते
ज्योतीताई परदेशी, सौ मनीषा ओव्हाळ, चंदा अंगिर, माया मोरे,  रेशमा कांबळे, आखतरी शेख,  शुभांगी नाईक, राधिका भालेराव, रेणुका जोगदंड, इत्यादी पुणे शहर रुग्णसेवा समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. मदर्स डे निम्मित राधिका भालेराव यांनी आपल्या मातेस मिळालेल्या पुरस्कारा बद्दल रुग्ण समितीचे अभिनंदन आणि आभार व्यक्त केले. पाहुण्यांचे स्वागत प्रशांत टेके, प्रास्ताविक  विशाल जाधव, सूत्रसंचालन इंद्रजित भालेराव, आणि आभार अनिल भिसे यांनी मानले.

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...