
लक्ष्मण किसन काशितकर
सामाजिक कार्य, सेवाभाव आणि शौर्याचे प्रतीक
लक्ष्मण किसन काशितकर, रहिवासी येरवडा गावठाण, यांनी गेली चार दशके जीवनाज्योत मित्र मंडळ, हनुमान मित्र
मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव आणि आदर्श मित्र मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव, शिवजयंती, नवरात्रोत्सव
यांसारखे सांस्कृतिक उपक्रम राबवतानाच अनेक सामाजिक कार्ये केली आहेत.
महाशिवरात्रीला महादेवाच्या डोंगरावर भाविकांसाठी पाणी वाटप, वारकऱ्यांना दूध, केळी आणि चिवडा वाटप, “एक
गाव एक होळी” उपक्रमाचा प्रारंभ, तसेच लोकांच्या सुख-दुःखात कायम सहभागी राहणे, हे त्यांचे कार्य विशेष ठरते.
28 जानेवारी 1998 रोजी येरवडा पुलावरून पाण्यात पडलेल्या बस दुर्घटनेत, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेकांचे
प्राण वाचवण्याचे धाडस त्यांनी दाखवले, ज्यासाठी त्यांना महानगरपालिकेसह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
या घटनेनंतर त्यांना भेटण्यासाठी त्या वेळचे पालकमंत्री, महापौर, आयुक्त आणि मान्यवर ससून रुग्णालयात आले
होते. गेली 27 वर्षे पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळात त्यांनी प्रामाणिक सेवा बजावली आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन दैनिक महा मेट्रो तर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले.