विद्यार्थी दशेत मिळाला बॅलेट द्वारे मताधिकार

Dilip KurhadeEducationYouthSocialPuneCity27/06/2025564 Views

विद्यार्थी दशेत मिळाला बॅलेट द्वारे मताधिकार
सुंदरबाई मराठे विद्यालयाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

पुणे : गेनबा सोपानराव मोझे संस्थेचे खराडी येथील सुंदरबाई मराठे विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ निवडणूक शुक्रवार ( ता. २७) रोजी अतिशय उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात घेण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्यात आला. लोकशाही मध्ये मतदान हेच सर्व श्रेष्ठ दान, आपले एक मत शाळा बदलू शकते, शाळेमध्ये आपली कामे करणारा उमेदवार हा सुसंस्कृत , सुशिक्षित, आज्ञाधारक असेल तर आपल्या वर्गांची कामे होऊन आपल्या वर्गाची गुणवत्ता वाढू शकते, शिस्त लागू शकते, अशा मार्गदर्शक सूचना देऊन, प्रसिद्धी पत्रक तयार करणे, फोटोसहीत मतदार यादी तयार करणे, वर्ग मंत्रिमंडळ स्थापन करणे, उमेदवारी अर्ज भरून घेणे, निवडणूक चिन्ह वाटप करणे, मतपत्रिका तयार करणे, वर्गा वर्गांमध्ये प्रचार करणे , निवडणुकीच्या आदल्या दिवशी आचारसंहिता व निवडणुकीच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया यात केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक 1, मतदान अधिकारी क्रमांक 2, मतदान अधिकारी क्रमांक 3, शिपाई व पोलीस याप्रमाणे दोन बूथ ची निर्मिती करण्यात आली. दोन्ही बूथच्या बाहेर दर्शनी भागात मतपत्रिका लावण्यात आली तसेच मतदान करताना मतदारांची ओळखपत्र म्हणजेच त्यांचे आधार कार्ड झेरॉक्स किंवा त्यांचा मागील वर्षाचे शाळेचे आय कार्ड हे ग्राह्य धरण्यात आले. विद्यालयात घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत एकूण 288 विद्यार्थी व 29 शिक्षक मतदार असे एकूण 317 मतदार होते. त्यापैकी 311 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 98.10 होती. मतदान करताना विद्यार्थ्यांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर मार्करने मतदान केल्याची खून ही करण्यात आली . बॅलेट पेपरवर उमेदवारांच्या नावापुढे शाळेच्या नावाचा शिक्का मारून आपले मत नोंदवून ते बॅलेट मतदान पेटीत स्वतः विद्यार्थ्यांनी टाकून आपले मत दिले. तसेच मतदान झाल्यानंतर दोन्ही बूथच्या बाहेरील बाजूस असलेल्या सेल्फी पॉइंट वर विद्यार्थ्यांनी सेल्फी काढून मतदानाचा आनंद घेतला.
निवडणूक झाल्यानंतर लगेचच मतमोजणी करण्यात आली.  

निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित शालेय मंत्रिमंडळातील सदस्यांना शालेय मंत्रिमंडळ बॅच वाटप व शाळेचे नेमणूक पत्र पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले. शाळेत शाळेचा मुख्यमंत्री, शिस्त मंत्री, अभ्यासमंत्री, सांस्कृतिक मंत्री, आरोग्य मंत्री, स्वच्छता मंत्री, ग्रंथालय मंत्री व क्रीडामंत्री असे एकूण आठ मुले व आठ मुली यांची निवड शाळेतील मतदारांनी केली. मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर लगेचच सर्व नवनिर्वाचित मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम मुख्य निवडणूक आयुक्त तथा मुख्याध्यापक संजय सोमवंशी यांनी सर्व नवनिर्वाचित मंत्र्यांना शपथ देऊन संपन्न झाला. त्यानंतर सर्व नवनिर्वाचित मंत्र्यांना शाळेचे नेमणूक पत्र ही देण्यात आले. या निवडणूक प्रक्रियेत विद्यालयातील विद्यार्थिनींनी ही बरोबरीने सहभाग घेत उत्कृष्ट असा सहभाग नोंदवला.
निवडणूक कार्यक्रमास गेनबा सोपानराव मोझे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ मोझे , शालेय समिती अध्यक्ष प्रा.अलका पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे , शालेय समिती सदस्य दिलीप देवकर, समीर खुळे, आरोग्य निरीक्षक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय सोमवंशी, पर्यवेक्षक सुनील वळसे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील शिक्षक दीपक सोनवणे व रोहित डामरे यांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील मराठी विभाग प्रमुख संदीप लिमगूडे व बिना साळुंखे यांनी केले,तर कल्याणी राळे या नवनिर्वाचित शालेय मुख्यमंत्री मुलीने विद्यार्थी मनोगत व्यक्त केले. सर्व प्रमुख पाहुणे व विद्यार्थ्यांचे आभार विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका कवेकर यांनी मानले.

 

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...