विमानतळ धावपट्टीच्या विस्तारसाठी हवाई दलाने बर्माशेल झोपडपट्टी धारकांना घरे रिकामी करण्याच्या नोटीस
पुणे : लोहगाव विमानतळ धावपट्टीच्या विस्तारसाठी हवाई दलाने बर्माशेल (इंदिरानगर) झोपडपट्टी धारकांना घरे रिकामी करण्याच्या नोटीसा बजाविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार सुनील टिंगरे यांनी जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना भेटून निवेदन दिले.
पुणे महापालिकेतील इंदिरानगर हि हवाई हद्दीतील जागेतील वस्ती आहे. मात्र गेल्या तीन ते साडेतीन दशकात येथील लोकप्रतिनिधींनी अनेक विकासकामे केली आहेत. यामध्ये पाण्याची , सांडपाण्याची वाहिनी टाकणे, सिमेंट काँक्रीटीकरण , दवाखाना , शाळा उभारले आहेत. अनेकांनी लाखो रुपये खर्च करून स्वतःची घरे उभारली आहेत. हवाई दलाने इतक्या वर्षांनी नोटिसा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
लोहगाव सर्व्हे क्रमांक २४२ मधील ४१ एकर ३० गुंठे जमिनीवर बेकायदा झोपडपट्टी धारकांनी अतिक्रमणे केली आहेत.ही जागा हवाई दलाने १९६२ साली धावपट्टीच्या विस्तारासाठी अधिग्रहित केलेली आहे.३१ जुलै १९६९ रोजी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसे जाहीर केले आहे.हवाई दलाच्या ताब्यातील संरक्षण जमिनीच्या संदर्भात व्यवस्थापनाने २०२१ मध्ये संपर्ण टप्प्याचे सर्व्हेक्षण केले.१ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यात सर्व्हे क्रमांक २४२ मधील ४१ एकर जागेत नागरिकांनी अतिक्रमण केल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
त्यामुळे हवाई दलाने विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारासाठी बर्माशेल झोपडपटूी धारकांना नोटीसा बजावून घरे रिकामी करण्यास सांगितले आहे. सदर कलम ४ च्या उपकलम (१) नुसार बेदखल का करण्यात येऊ नये,याचा खुलासा सादर करण्यास सांगितले आहे.येत्या १४ जुलै रोजी इस्टेट ऑफिसर एयर फोर्स स्टेशन कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.हवाई दलाने घरे रिकामी करण्याच्या नोटीसा बजाविल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.स्थानिक माजी आमदार सुनील टिंगरे यांना भेटून नागरिकांनी माहिती दिली.
माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे म्हणाले, ” १९८२ पूर्वीपासून बर्माशेल झोपडपटूी अस्तित्वात असताना हवाई दलाने लोकांना घरे खाली करण्याच्या नोटीसा दिल्याने निवाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, निवेदनाची पडताळणी करून, सर्व वस्तुस्थिती लक्षात घेऊन बर्माशेल येथील रहिवाशांच्या घराला धक्का लावणार नाही, तसेच येथील एकाही घराचा मिटर काढणार नाही असे आश्वासन उपस्थित रहिवाशांना दिले.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली.आयुक्तांनी संरक्षण विभागाला उत्तर देऊन परिस्थिती जैसे थे राहील असे आश्वासन दिले.यावेळी स्थानिक रहिवाशी लक्ष्मीताई ओव्हाळ, गोजरबाई जेटीथोर, नामदेव राठोड, किरण जाधव, माधव सुरवसे, शिवा धोत्रे, शानू चलवादी आदी रहिवाशी उपस्थित होते.
हवाई दलाने बर्माशेल झोपडपट्टी धारकांना घरे रिकामी करण्यासाठी नोटीसा बजाविल्याने बेघर होण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांची भेट घेतली.आज मंगळवारी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन विषय मांडणार आहे.
सुनील टिंगरे,माजी आमदा
पुणे महापालिकेतील इंदिरानगर हि हवाई हद्दीतील जागेतील वस्ती आहे. मात्र गेल्या तीन ते साडेतीन दशकात येथील लोकप्रतिनिधींनी अनेक विकासकामे केली आहेत. यामध्ये पाण्याची , सांडपाण्याची वाहिनी टाकणे, सिमेंट काँक्रीटीकरण , दवाखाना , शाळा उभारले आहेत. अनेकांनी लाखो रुपये खर्च करून स्वतःची घरे उभारली आहेत. हवाई दलाने इतक्या वर्षांनी नोटिसा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.