शहराच्या मध्यवर्ती भागात ५३ हजार ४९३ गणपतींचे विसर्जन

शहराच्या मध्यवर्ती भागात ५३ हजार ४९३ गणपतींचे विसर्जन
भाविकांकडून एकूण २० टन ४२४ किलो टन निर्माल्य गोळा

पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कसबा – विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालमार्फत उभारण्यात आलेल्या हौदांवर व घाटांवर एकूण १६३९१ गणपतींचे विसर्जन करण्यात आले. तसेच भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालमार्फत उभारण्यात आलेल्या हौदांवर व घाटांवर एकूण १३४३३ गणपतींचे विसर्जन करण्यात आले.बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालमार्फत उभारण्यात आलेल्या हौदांवर व घाटांवर एकूण २३६६९ गणपतींचे विसर्जन करण्यात आले असे एकूण परिमंडळ पाच चे कार्यालयाचे अंतर्गत एकूण ५३४९३ गणपतींचे विसर्जन करण्यात आले. या या दरम्यान भाविकांकडून एकूण २०.४२४ मे. टन इतके निर्माल्य गोळा करणेत आले. तदनंतर लगेचच पुणे महानगरपालिकेच्या सफाई कर्मचा-यांनी पहद्दीतील सर्व मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यांवर साफ-सफाईस सुरुवात केली व साधारण दोन तासांमध्ये मुख्य रस्त्यांची व बहुतांश परिसराची स्वच्छता करुन घेण्यात आली.
महानगरपालिका उप आयुक्त, परिमंडळ पाच कार्यालयाच्या अखत्यारीत कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालय, भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय व बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या भागांचा समावेश होतो. यामध्ये मुख्यत्वे कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालय व भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाच्या भाग हा शहराचा मध्यवर्ती भाग आहे. या ठिकाणी शहरातील सर्व मुख्य रस्त्यांचा म्हणजेच लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, शंकरशेठ रस्ता या प्रमुख रस्त्यांचा समावेश होतो. तसेच शहरातील मानाचे पाच गणपती म्हणजेच कसबा गणपती, गुरुजी तालीम , तुळशीबाग , तांबडी जोगेश्वरी, केसरीवाडा तसेच
भाविकांच्या दृष्टीने मुख्य आकर्षण असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती या गणपतींचा समावेश होतो.
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालय व भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयामार्फत नदिकिनारी एकूण पाच हौद, तसेच परिमंडळ पाच कार्यालयाच्या हद्दीत एकूण ८१ ठिकाणी घरगुती गणपतींचे विसर्जनासाठी हौदांची व्यवस्था करण्यात आली होती. विसर्जन व्यवस्थेअंतर्गत विविध हौदांचे ठिकाणी व सर्व मुख्य रस्त्यांवर व गणेश मंडळांचे ठिकाणी दोन शिफ्टमध्ये स्वच्छता सेवकांची नेमणुक करण्यात आली होती. व ठिकठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी मोबाईल टॉयलेट्स उभारणेत आले होते. व आवश्यक त्या ठिकाणी अॅम्ब्युलन्स, आय.सी.यु व डॉक्टर्स यांची नेमणुक करण्यात आले होती. गणेशोत्सव सुरु होणेपुर्वी मिरवणूकीस अडथळा ठरणा-या व धोकादायक फांद्यांची वृक्ष छाटणी आवश्यकतेनुसार करण्यात आली. तसेच पोलिस विभागामार्फत मागणी केल्यानुसार व आवश्यकतेनुसार पोलिस मदत केंद्र,
वॉच टॉवर व अन्य सोई-सुविधांची उभारणी व व्यवस्था करण्यात आली होती.
अनंत चर्तुदशिच्या दिवशी कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत महात्मा फुले मंडई या ठिकाणावरुन सकाळी ठिक ९:३० वा. केंद्रीय मंत्री श्री. मुरलीधर मोहोळ व उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा मा. अजितदादा पवार यांचे शुभ हस्ते व, उप सभापती, महाराष्ट्र राज्य निलम गो-हे, कॅबिनेट मंत्री मा. चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, आयुक्त तथा प्रशासक पुणे महानगरपालिका नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रदिप चंद्रन (ज), अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांचे प्रमुख उपस्थितीत टिळक पुतळ्यास व यशवंतराव चव्हाण यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मानाच्या पहिल्या श्रींची आरती करुन पुणे शहरातील सार्वजनिक गणपती मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. हा कार्यक्रम उप आयुक्त परिमंडळ पाचचे सुनिल बल्लाळ व उप अभियंता सुहास जाधव यांचे नियंत्रणाखाली व सहाय्यक आयुक्त प्रकाश वालगुडे ( कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालय ) यांचे देखरेखीखाली करण्यात आला.
या सर्व मिरवणुक मार्गांवर नियंत्रणाकरिता पुणे महानगरपालिकेमार्फत अलका चौक, साहित्य परिषद चौक व माती गणपती या ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणेत आले
होते. नियंत्रण कक्षात म.न.पा. मार्फत तीन शिफ्ट मध्ये अधिकारी व कर्मचारी यांची व्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षिततेच्या दृष्टीने ठिकठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले होते. तसेच आवश्यकतेनुसार विद्युत विभागामार्फत विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अलका चौक येथे दुपारी दोन वाजता मानाचा पहिला गणपती कसबा गणपती यांचे आगमन होवून तदनंतर गणेश मंडळांचे विसर्जनास सुरुवात झाली. सदरची मिरवणुक अत्यंत सुरळीत व सुरक्षितपणे पार पाडली. या दरम्यान केळकर रस्ता येथून एकूण १११ गणपती मंडळांचे विसर्जन झाले, लक्ष्मी रस्त्यावरुन एकूण २५१ गणपती मंडळांचे विसर्जन झाले व टिळक रस्ता येथून एकूण १८८ गणपती मंडळांचे विसर्जन झाले असे एकूण ५५० गणपती मंडळांचे विसर्जन झाले. तसेच कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालमार्फत उभारण्यात आलेल्या हौदांवर व घाटांवर एकूण १६३९१ गणपतींचे विसर्जन करण्यात आले. तसेच भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालमार्फत उभारण्यात आलेल्या हौदांवर व
घाटांवर एकूण १३४३३ गणपतींचे विसर्जन करण्यात आले. बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालमार्फत उभारण्यात आलेल्या हौदांवर व घाटांवर एकूण २३६६९ गणपतींचे विसर्जन करण्यात आले असे एकूण परिमंडळ पाच चे कार्यालयाचे अंतर्गत एकूण ५३४९३ गणपतींचे विसर्जन करण्यात आले. या दरम्यान भाविकांकडून एकूण २०.४२४ मे. टन इतके निर्माल्य गोळा करणेत आले. तदनंतर लगेचच पुणे महानगरपालिकेच्या सफाई कर्मचा-यांनी पहद्दीतील सर्व मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यांवर साफ-सफाईस सुरुवात केली व साधारण दोन तासांमध्ये मुख्य रस्त्यांची व बहुतांश परिसराची स्वच्छता करुन घेण्यात आली.

 

mm9sep2025page1 mm9sep2024page2 mm9sep2025page3 mm9sep2025page4

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...