शिवनेरी, रायगड, राजगडसह बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान्यता
गडकिल्ले अधिक सुंदर, भक्कम आणि सुरक्षित होणार
पुणे :छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीची दुर्गमता बघून ज्या अभेद्य किल्ल्याच्या आधारावर स्वराज्य निर्माण केले, त्या किल्ल्यांची दखल आता युनेस्कोने घेतली आहे. राज्यातील शिवनेरी, रायगड, राजगड, साल्हेर, लोहगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी अशा बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान्यता मिळाली आहे. सप्टेंबरमध्ये युनेस्कोचे प्रतिनिधी या बारा किल्ल्यांच्या मूल्यमापनासाठी भेट घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान्यता मिळवण्यासाठी पाठविण्यात आली होती. यामध्ये रायगड, साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यांचा समावेश होता . या सर्व किल्ल्यांच्या मूल्यमापनासाठी सप्टेंबर महिन्यात युनेस्कोची टीम किल्ल्यांना भेटी दिली होती .
या ऐतिहासिक क्षणी, सर्वांनी एकत्र येऊन आपल्या गौरवशाली इतिहासाचे संवर्धन करण्याची गरज आहे. आजवर ज्यांनी गडकिल्ल्यांचे संवर्धन केले, त्यांचे संरक्षण केले, पुढील काळात विविध उपक्रम राबवणार आहोत, ज्यामुळे गडकिल्ले अधिक सुंदर, अधिक भक्कम आणि सुरक्षित होतील.
.
“राज्यातील शिवनेरी, राजगड, रायगड या किल्ल्यांसह बारा किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश झाले आहे. युनेस्कोचे प्रतिनिधी सप्टेंबरमध्ये या किल्ल्यांचे मूल्यमापन करण्यासाठी भेट दिली होती .
— विलास वहाणे, उपसंचालक, पुणे राज्य पुरातत्व विभाग
जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत किल्ल्यांचे जतन व संवर्धन
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत राज्यातील गड-किल्ले, मंदिरे व महत्वाची संरक्षित स्मारके इत्यादींच्या संवर्धनासाठी तीन टक्के निधीचा विनियोग करण्यात येत आहे. यामध्ये गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धन, देखभाल व दुरुस्ती, पर्यटक व भाविकांसाठी सोई-सुविधा, सुशोभिकरण करण्यात येत आहे.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणकडे २८८ स्मारके
कातळात खोदलेल्या, जागतिक वारसा म्हणून सुप्रसिद्ध अशा अजिंठा-वेरूळ लेण्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात उभे राहिलेले राजगड व सिंधुदुर्ग किल्ले, यादव व मराठा काळातील दर्गे व मकबरे, तसेच वसाहतकालीन स्थापत्यांचा समावेश आहे. ऐतिहासिक व पुरातन स्मारकांपैकी केंद्र सरकारमार्फत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने २८८ स्मारके राष्ट्रीय महत्त्वाची म्हणून जतन केलेली आहेत.