शुभेच्छांसाठी हार-पुष्पगुच्छ नको; विद्यार्थ्यांसाठी वही पेन सारखे शैक्षणिक साहित्य द्यावे

शुभेच्छांसाठी हार-पुष्पगुच्छ नको;  विद्यार्थ्यांसाठी वही पेन सारखे शैक्षणिक साहित्य द्यावे

– महापौर रवी लांडगे यांचे भेट देणाऱ्या नागरिकांकरीता आवाहन….

 

पिंपरी:-  महापौर पदाच्या शुभेच्छा देताना कुणीही हार, पुष्पगुच्छ अथवा अन्य भेटवस्तू घेऊन येऊ नयेत. त्याऐवजी द्यावयाच्याच असल्यास महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य म्हणून उपयोगी ठरेल अशी पुस्तके, वह्या, लेखन साहित्य किंवा अन्य शैक्षणिक वस्तू शुभेच्छा अथवा भेटीच्या वेळी आणाव्यात, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांनी केले आहे.

महापौर रवी लांडगे हे नुकतेच दोन दिवसीय वरिष्ठ नेत्यांच्या भेटी व दौऱ्यावर होते. या कालावधीत शहरातील नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेता न आल्याबद्दल त्यांनी नागरिकांची दिलगिरी देखील व्यक्त केली.

हार-पुष्पगुच्छ क्षणिक सन्मानाचे प्रतीक असले, तरी विद्यार्थ्यांसाठी दिलेले शैक्षणिक साहित्य त्यांच्या शिक्षणासाठी व भविष्यासाठी अधिक उपयुक्त ठरते, असे महापौर रवि लांडगे यांनी बोलताना सांगितले. या उपक्रमातून महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना थेट शैक्षणिक मदत मिळणार असून, शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत साधनांची पूर्तता होण्यास हातभार लागणार आहे. औपचारिक शुभेच्छांऐवजी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात गुंतवणूक करण्याचा हा सकारात्मक व सामाजिकदृष्ट्या उपयुक्त संदेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक बळ वाढावे, त्यांना आवश्यक साहित्य वेळेवर उपलब्ध व्हावे आणि समाजामध्ये शिक्षणाबाबत सकारात्मक जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने हे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा, असेही महापौर लांडगे यांनी आवाहन केले आहे.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...