श्रीकांत वाघ पत्रकारिता, साहित्य आणि कलाक्षेत्रातील अविस्मरणीय प्रवास

श्रीकांत वाघ पत्रकारिता, साहित्य आणि कलाक्षेत्रातील अविस्मरणीय प्रवास

श्रीकांत वाघ यांनी १९८९ पासून ते आज २०२५ पर्यंत अखंड ३६ वर्षे पत्रकारितेत कार्यरत राहून टाईम्स ऑफ इंडिया,

इंडियन एक्स्प्रेस, लोकसत्ता, हिंदुस्थान टाईम्स, एशियन एज, सकाळ अशा नामांकित वृत्तपत्रांतून कार्य केले आहे. या
दीर्घ प्रवासात त्यांनी अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, देवानंद, दिलीप कुमार, वहिदा रेहमान, धर्मेंद्र, शशी कपूर, माधुरी
दीक्षित, डॉ. श्रीराम लागू, पुलं देशपांडे, शांता शेळके, विजय तेंडुलकर, निळूभाऊ फुले, अशोक सराफ, विक्रम गोखले,
नारायण सुर्वे, सुरेश भट, मंगेश पाडगावकर, रतन टाटा, शि. द. फडणीस, शंतनुराव किर्लोस्कर, राहुल बजाज यांसारख्या
शेकडो मान्यवरांची भेट घेतली, मुलाखती केल्या आणि वार्तांकन केले.
पत्रकारितेबरोबरच त्यांनी गरवारे कॉलेजच्या मास कम्युनिकेशन विभागात पत्रकारिता व फोटो जर्नालिझमचे प्रशिक्षण
दिले. आगाखान पॅलेस येथील कस्तुरबा महिला ग्रामोद्योग खादी विद्यालयात सलग तीस वर्षे फोटोग्राफी,
व्हिडिओग्राफी, फिल्म मेकिंग, उद्योजकता आणि नेतृत्व विकास या विषयांवर मार्गदर्शन केले. महाराष्ट्र उद्योजकता
विकास केंद्रात तसेच साहित्य कला जागतिक अकादमी पुणे या संस्थेतून सूत्रसंचालन, भाषणकला, व्हॉईस कल्चर,
स्क्रिप्ट रायटिंग, मोटिव्हेशनल स्पीकिंगसह विविध विषयांवर गेली अनेक वर्षे प्रशिक्षण दिले आहे.
लेखन क्षेत्रातही त्यांचा प्रभाव तितकाच गडद आहे. “सुनामी” या त्रिभाषिक पुस्तकाला अमेरिकेचा २००६ सालचा
उत्कृष्ट संपादनासाठीचा "फेस ऑफ द इयर" पुरस्कार मिळाला. “ऐतबार” हा कवितासंग्रह प्रसिद्ध असून त्यांनी मराठी,
हिंदी, उर्दू काव्य व गझल लेखनाच्या पस्तीस कार्यशाळा घेतल्या आहेत. “मेरी धून” या म्युझिक कंपनीसाठी ४५० हून
अधिक हिंदी-उर्दू गीते लिहिली आहेत. रेडिओ, टीव्ही, शैक्षणिक संस्था, बिल्डर्स आदींसाठी जाहिरात लेखन, जिंगल्स व
कॉपी रायटिंग केले आहे.
त्यांचे प्रकाशित साहित्य “ऐतबार” व “सुनामी” यांसह अनेक वृत्तपत्रांत आणि मासिकांतून प्रकाशित झाले असून
आगामी प्रकाशनांत “असत्यमेव जयते” ही कादंबरी, “सौदा द डिल” हे एकांकिका नाटक, “फोटो जर्नालिझम – काल,
आज, उद्या” हे पुस्तक, गझलसंग्रह आणि कथासंग्रह यांचा समावेश आहे. कवी आणि गझलकार म्हणून त्यांनी सुरेश
भट, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, विठ्ठल वाघ यांसारख्या मान्यवरांसोबत गझल सादरीकरण केले आहे.
त्यांचा हा प्रवास अजूनही सुरू असून, या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन दैनिक महा मेट्रो तर्फे त्यांना सन्मानित
करण्यात आले आहे.
=======================================================

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...