समाज व्यसनमुक्त व गुन्हेगारी मुक्त होण्यासाठी बालवयात संस्कार करण्याची गरज – ॲड अभिजीत पोळ

Dilip KurhadeSocialEducationPunereligiousCityYouth23/02/2026106 Views

समाज व्यसनमुक्त व गुन्हेगारी मुक्त होण्यासाठी बालवयात संस्कार करण्याची गरज
– ॲड अभिजीत पोळ
येरवड्यात ‘‘व्हॅलेंटाईन डे ‘ ऐवजी मातृ- पितृ पूजन दिन साजरा

येरवडा : भारतीय संस्कृती प्राचीनकाळा पासून माणसाला चांगली शिकवण देते. येतील संतांनी मानवाला चांगले विचार दिले . सध्याची परिस्थिती पाहता समाज व्यसनमुक्त व गुन्हेगारी मुक्त होण्याची गरज आहे. त्यासाठी मुला-मुलींवर लहानपणापासून संस्कार रुजविण्यासाठी गरज असल्याचे मत पुणे बार असोसिएशनचे सचिव अभिजीत पोळ यांनी व्यक्त केले .
येरवड्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात भारतीय संस्कृती रक्षक सेने तर्फे व्हॅलेंटाईन डे की नकार संकल्पनेतून मातृ पितृ पूजनाचा कार्यक्रमात ते बोलत होते . या कार्यक्रमात मुला मुलींनी आपल्या आई वडिलांच्या पद् पूजन करून आरती केली. भारतीय संस्कृतीचे रक्षण व्हावे. यादृष्टीने भारतीय संत श्री आसारामजी बापू यांच्या संकल्पनेने प्रेरणेने संपूर्ण भारतभर हा उपक्रम साजरा केला जातो. प्रत्येक मुलांमध्ये आपल्या आई-वडिलांबद्दल प्रेम, आदर, जिव्हाळा निर्माण होऊन खरा प्रेम दिवस साजरा होईल. असा संकल्प साधु-संतांचा सिद्ध होताना दिसत आहे.
भारतीय संस्कृती रक्षक सेने मार्फत गेली पंधरा वर्षे 14 फेब्रुवारी ~व्हॅलेंटाईन डे~ ऐवजी मातृ-पितृ पूजन दिन हा कार्यक्रम साजरा केला जातो. यावेळी ज्योतीताई सावर्डेकर , अशोक जगताप सनी चव्हाण , उद्योजक बाबासाहेब औटी, नगरसेवक विशाल मलके , सुरेंद्र पठारे , शंकर संगम , महेंद्र गायकवाड ,सचिन धीवार उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय संस्कृती रक्षक सेनेचे बाळासाहेब विश्वासराव, संतोष गायकवाड, किसन पाटील, सुजित धनक, सुमित भुजबळ, विनोद वाल्लेकर, गौतम वडावराव, हेमंत उपरे, राजाभाऊ शितोळे, सुमित गुप्ता, गणेश सुर्वे, राधा नागोसे यांनी परिश्रम घेतले

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...