सराफ दुकान लुटणाऱ्या तीन आरोपींना मुद्देमालासह अटक

Dilip KurhadePMCCrimePune02/07/2025260 Views

सराफ दुकान लुटणाऱ्या तीन आरोपींना मुद्देमालासह अटक

पुणे : वडगाव बु. येथील गजानन ज्वेलर्स या सराफी दुकानामध्ये मंगळवारी अनोळखी चोरटयांनी प्रवेश केला होता. दुकानदार महिला फिर्यादी त्यांच्या डोक्यात व डावे दंडावर लोखंडी हत्याराने वार करुन गंभीर जखमी केले होते. आरोपींनी कपाटामधील साडेचार लाख रुपये किमतीचे ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने पळवून नेले. यावेळी आरोपींनी हातामधील पिस्तोल व लोखंडी हत्यार हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण करीत निघुन गेले होते.

या घटनेनंतर तात्काळ गुन्हे शाखेकडील युनिट १, २,३ तसेच खंडणी विरोधी पथक व दरोडा वाहन चोरी विरोधी पथक यांनी घटनास्थळास भेटी देवुन संमातर तपास सुरु केला होता. तपासा दरम्यान गुन्हे शाखा, युनिट ०३ व नांदेड सिटी तपास पथक यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक करून आरोपींची ची ओळख पटवुन आरोपी निष्पन्न करून गुन्हयातील विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेतले. त्याच्याकडुन गुन्हयात वापरलेले मोटार , मोटार सायकल हस्तगत केली आहे. त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये व गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हयातील पाहिजे आरोपी बाबत माहिती काढुन गुन्हे शाखा युनिट तीन चे पथक व सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पथक हे अहमदनगर या ठिकाणी रवाना करुन गुन्हयातील उर्वरित तीन आरोपी. वरदन संजय खरटमल ( वय २० वर्ष रा. शांताईनगर पठार वस्ती, कुदळेचाळ, वडगाव बुा.) , अमर हनुमंत बाभळे ( वय २० वर्ष रा. उत्कर्ष शाळेच्या पाठीमागे, धवाडी, वडगाव बुा), ओकांर रवि शिंदे ( वय २२ वर्ष रा. मानाजीनगर, विघ्नहर्ता हाईटस, प्लॅट नंबर २, न-हे) यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे सखोल चौकशी करुन नमुद गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.
यामध्ये १,३५,०००/- रुपये किमंतीची ०१ सोन्याची चैन वजन अंदाजे १५ ग्रॅम डिझाईन असलेली , ९०,०००/- रुपये किमंतीची एक सोन्याची चैन वजन अंदाजे १० ग्रॅम ४, १,३५,०००/- रुपये किमंतीची तीन सोन्याची चैन प्रत्येकी वजन ०५ ग्रॅम, ९ ० हजार रुपये किमंतीची ०९ नेकलेस वजन अंदाजे १० ग्रॅम असा एकुण साडे चार लाख रू. किं. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले.

हि कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, (अति. कार्य. गुन्हे शाखा) विवेक मासाळ, पोलीस उप-आयुक्त, (परीमंडळ तीन ) संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त ( गुन्हे १) गणेश इंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त ( सिंहगड रोड विभाग) अजय परमार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ३, चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, खंडणी विरोधी पथक , सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, प्रविण काळुखे, सचिन यादव, पोलीस उप-निरीक्षक फरताडे, भांडवलकर, सपोफौ पंढरीनाथ शिंदे, पोलीस अंमलदार कैलास लिम्हण, किशोर शिंदे, अतुल साठे, तुपसौंदर, शनगारे, बोडरे, ताजणे, वेगरे, पुरषोत्तम गुन्ल्ला, तुषार किंद्रे, स्वप्निल मगर, कारके, मोहिते, झगडे, चव्हाण, माळवदकर, मोरे, क्षीरसागर यांचे पथकाने केली आहे.

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...