
सातारा जिल्ह्यातील सज्जन गडावर व परिसरात गेले चार दिवस धुवाधार पर्जन्यवृष्टी
समर्थ रामदास स्वामींच्या लाखो भक्तांच्या हृदयी स्थान असलेल्या सातारा जिल्ह्यातील सज्जन गडावर व परिसरात गेले चार दिवस धुवाधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. गड व प्रदक्षिणामार्ग धुक्यामध्ये हरवला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे येथे येणाऱ्या समर्थ भक्तांना निसर्गाचा अल्हाददायक अनुभव येत आहे.
(छायाचित्र- गिरीश प्रभाकर कुलकर्णी, पुणे)