सुदाम कृष्णाजी विश्वे, (ए.टी.डी,ए.एम, बी.ए.एम.ए.) पत्रकारिता, साहित्य आणि कलाक्षेत्रातील अविस्मरणीय प्रवास

 सुदाम कृष्णाजी विश्वे, (ए.टी.डी,ए.एम, बी.ए.एम.ए.) पत्रकारिता, साहित्य आणि कलाक्षेत्रातील अविस्मरणीय प्रवास

श्री. सुदाम कृष्णाजी विश्वे हे ए.टी.डी., ए.एम., बी.ए. (इतिहास) आणि एम.ए. (इतिहास) अशा भक्कम शैक्षणिक

पार्श्वभूमीचे, पुणे महानगरपालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयातील निवृत्त कलाशिक्षक असून त्यांनी ३५ वर्षे
सेवा केली आहे. चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत असताना विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी
अनेक उपक्रम राबविले. कला प्रदर्शने, विविध स्पर्धा, शासनाच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा, सकाळ
बालचित्रकला स्पर्धा यांसह इतर अनेक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत त्यांच्या यशात मोलाचा वाटा
उचलला.
२०१८ साली निवृत्तीनंतर त्यांनी लेखन क्षेत्रात पाऊल ठेवले आणि मुलांच्या भावविश्वाशी निगडित तसेच संस्कार
घडविणारे लेख, बोधकथा, बालकविता यांचे विपुल लेखन केले. त्यांच्या लेखनाला दै. सकाळ, सप्तरंग, लोकमत, केसरी
(छावा), महाराष्ट्र टाइम्स, महा मेट्रो, आधुनिक केसरी, साप्ताहिक भगवे वादळ, मनशक्ती, महाराष्ट्र शिक्षण त्रैमासिक,
शिक्षण संक्रमण अशा अनेक वृत्तपत्रे व मासिकांमध्ये स्थान मिळाले. “आईची शाळा” ही सकाळ सप्तरंगमध्ये प्रकाशित
झालेली त्यांची कविता विशेष गाजली. विविध दिवाळी अंकांमध्ये त्यांच्या कथा व कविता प्रकाशित झाल्या असून,
“पर्यावरणव्रती कुसुम” या डॉ. गीताली वि. म. संपादित ग्रंथात त्यांचा लेखही समाविष्ट आहे.
त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी त्यांना ‘आचिव्हर्स ऑफ पुणे’ सन्मान, सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत ज्येष्ठ नागरिक गटात
पारितोषिक, वि. ल. शिंत्रे कथा स्पर्धेतील पुरस्कार तसेच १९९९ साली पुणे मनपा तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला
आहे. रेखाटन, निसर्गचित्र आणि वाचन यांची त्यांना विशेष आवड असून, आपल्या कलात्मक आणि साहित्यिक
कार्यातून त्यांनी समाजात मौल्यवान योगदान दिले आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन दैनिक महा मेट्रो तर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...