सुमारे ४५ लाखांची ऑनलाईन फसवणूक ; काळेवाडी पोलिसांकडून एकाला अटक

सुमारे ४५ लाखांची ऑनलाईन फसवणूक*
काळेवाडी पोलिसांकडून एकाला अटक

काळेवाडी : शेअर मार्केटमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एकास तब्बल ४४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. सायबर गुन्ह्याचा पर्दाफाश करत काळेवाडी पोलिसांनी एका संशयितास अटक केली आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले बनावट बँक खाते आणि अ‍ॅप्लिकेशनमधील व्यवहार उघडकीस आले असून, आणखी आरोपींचा शोध सुरू आहे.

फिर्यादीस व्हीआयपी एन ३ स्टॉक मार्केट या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी केले . आरोपी विशाल आणि ट्रेडिंग मॅनेजर दिव्या भट यांनी क्रीशन इन्व्हेस्टमेंट एफपीआय एल एल सी ‘ या कंपनीचे बनावट अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले. अ‍ॅपच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगद्वारे मोठा नफा मिळेल, अशी भूल देत विविध बँक खात्यांवर ४४ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.

गुंतवणुकीनंतर बनावट अ‍ॅपवर दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक नफा दाखवण्यात आला. मात्र, नफा काढण्यासाठी १५% म्हणजे ३० लाख सात हजार रुपयांची मागणी करण्यात आल्यावर फिर्यादीला फसवणुकीचा संशय आला. त्यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली . तपासादरम्यान फसवणुकीची रक्कम बंधन बँक अकाऊंट नंबर वर जमा झाल्याचे समोर आले. त्यातून [आय सी आई सी आई बँक खात्यात सहा लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. हे खाते ज्वेल थोर्न अग्रोकॉर्प या कंपनीच्या नावावर असून त्याचे संचालक अक्षय राजेंद्र बनेकर आणि गणेश चंद्रकांत थोरात असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी अक्षय राजेंद्र बनेकर यास शोधून काढले व अटक केली. त्याने आपण व मित्राने संयुक्त खाते सायबर गुन्ह्यासाठी इतर व्यक्तीस दिले असल्याची कबुली दिली. या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम, माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ चे कलम ६६ (C), ६६ (D) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशीकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उप आयुक्त संदिप डोईफोडे, सहाय्यक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांच्या पथकाने केली. या पथकात सपोनि प्रविण स्वामी, पोलीस अंमलदार परशुराम चव्हाण, सुरज शिंदे, दीपक भोसले, नितेश बिच्चेवार, अतुल लोखंडे, श्रिकांत कबुले, दीपाली चव्हाण यांचा सहभाग होता. सायबर फसवणुकीप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून आणखी आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Recent Comments

No comments to show.
Categories
Loading Next Post...
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...