स्कीझोफ्रेनिया रुग्णांशी प्रेमाने वागणे आवश्यक :संग्राम खोपडे
परिवर्तन संस्थेच्या कार्यक्रमात केले मतप्रदर्शन
पुणे : जागतिक स्किझोफ्रिनिया दिना निमित्त ‘जाऊ आनंदाच्या गावा’ हा स्किझोफ्रिनिया सारख्या तीव्र मानसिक आजाराला समोरे जात आनंदाने जगू पाहणाऱ्या रुग्ण आणि नातेवाकाईकांचा कलाविष्कार पत्रकार भवन हाॅल येथे नुकताच पार पडला. *परिवर्तन संस्था* संचालित ‘मानसरंग’ आणि किरण गटाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आर जे संग्राम खोपडे (सुप्रसिद्ध रेडिओ जॉकी) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की मनोविकारतज्ञांकडे जाणं म्हणजे आपण काहीतरी जगावेगळे करतो आहे असे समजू नये . वेळप्रसंगी मदत लागली तर आपण ही अशा तज्ञांचा सल्ला घेतो हे नमूद केले. त्याचबरोबर मानसिक विकारातून जात असतानाही आपल्या मानसमित्रांनी ज्या प्रकारे कलेचे प्रदर्शन केलं ते खरोखर वाखाण्यासारखं आहे. प्रत्येकाने कोणती तरी कला जोपासणे आवश्यक आहे इतरांसाठी नव्हे तर स्वतःसाठीच कला खूप प्रेरणादायी ठरतात असे भाष्य केले. आजार आहे म्हणून स्वतःला अजिबात कमी समजू नका तुम्ही पण आमच्या इतकेच नॉर्मल आहात असा आपुलकीचा सल्लाही दिला. मनोरुग्णांनी केलेल्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले. उपस्थित सर्वांचे स्वागत रेश्मा यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले. स्किझोफ्रेनिया आजाराशी संघर्ष करणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत करणारी कुठलीही यंत्रणा आपल्याकडे नाही.अशी यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न परिवर्तन संस्था मानसरंग किरण गटाच्या माध्यमातून करत आहे. हा पूर्ण कार्यक्रम किरण गटातील रुग्ण मित्र व त्यांचे पालकच करुन समाजामध्ये प्रबोधन करण्याचे काम करतात असे त्यांनी नमूद केले
कार्यक्रमला स्किझोफ्रेनिया आजाराला सामोरे जाणाऱ्या मानसमित्रांचे नातेवाईक आणि मानसमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी कार्यक्रमात विविध गाणी, नृत्य,अभिवाचन सादरीकरण केले काजल व चंद्रकिरण यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मनोगतांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मला सुंबे व मुक्ता देशपांडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मंजिरी दातार यांनी त्यांच्या मनोगतामध्ये, मनाचे आजार, त्याच्याविषयी समाजाचा असलेल्या दृष्टिकोन आणि डॉक्टर म्हणून त्यांना येणारी आव्हानं यांच्याविषयी थोडक्यात सांगितलं. त्याचबरोबर मानसरंग सारखा सपोर्ट ग्रुप जर अस्तित्वात असेल तर रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना एकटेपणा वाटणार नाही आणि ते मुख्य प्रवाहात लवकरात लवकर येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ऋतुजा चाफेकर ह्या फोर्ब्स मार्शल कंपनीच्या सीएसआर मॅनेजर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या. त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये महिलांबरोबर मुलींबरोबर काम करताना त्यांना येणारी आव्हानं आणि परिवर्तन चा मानसरंग सारखा सपोर्ट ग्रुप यांना आपण कसं जोडून घेऊ शकतो याविषयी त्यांचे मत व्यक्त केले. व अशा पद्धतीची गट बांधणीचे महत्त्व समजून सांगितले.
राजू इनामदार यांनी सर्व उपस्थित आमचे आभार मानले. संपूर्ण परिवर्तन टीमने हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.