हुक्क्यामध्ये अमलीपदार्थ  गांजा, ब्राऊनशुगरसह सुंगधी द्रव्य 

सौजन्य चाट जीपीटी प्रातिनिधिक चित्र
भाग -२
हुक्क्यामध्ये अमलीपदार्थ 
गांजा, ब्राऊनशुगरसह सुंगधी द्रव्य 
 पुणे : पुणे शहरात सुरू असलेल्या हॉटेलमधील हुक्का पार्लरमध्ये ग्राहकांना गांजा, ब्राऊनशुगरची तलफ हुक्क्याच्या माध्यमातून भागविली जाते. त्यामुळे हुक्का ओढल्यानंतर अधिकच झिंग येते. त्यामुळे हुक्का ओढणारी व्यक्ती व्यसनाच्या आहारी जात असल्याचे व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेणाऱ्या युवकाने सांगितले. याला व्यसनमुक्ती केंद्रातील समुपदेशकांनी दुजोरा दिला आहे.
 पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील अमलीपदार्थ  विरोधी पथकाला गुंगारा देऊन शहरातील हॉटेल्सवाले राजरोसपणे हुक्का पार्लरमध्ये गांजा, ब्राऊनशुगर आदी वापरत असल्याचे आढळून आले आहे. हुक्का पार्लर चालकांना कोणा, कोणाची मर्जी सांभाळावी लागते याची यादीत त्यांच्याकडे असते. या यादीत अग्रक्रमावर अमलीपदार्थ  विरोधी पथकाचे नाव असते. त्यानंतर गुन्हेशाखा, स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकारीच नव्हे तर गस्तीवर असणाऱ्या बीट मार्शलची सुध्दा त्यांना मर्जी सांभाळावी लागते. त्यामुळे हुक्क्यामध्ये ‘हर्बल’ पदार्थ वापरले जातात हा युक्तीवाद फोल ठरतो. तर हुक्क्यामध्ये अमलीपदार्थ घातले  जात असल्याचे पुरावे प्रत्यक्षदर्शी नव्हे तर व्यसनाधिन झालेले व आता उपचार घेत असलेल्या रुग्णांनी सांगितले.यासह अशा रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर व समुपदेशकांनी सुध्दा याला दुजोरा दिला आहे.
      ‘‘ हुक्क्यामध्ये गांजा, ब्राऊनशुगर टाकत असण्याची दाट शक्यता आहे. व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या आरोग्य तपासणी अहवालात आढळून येते. ’’ – अजय दुधाने, संचालक, समुपदेशक, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र
       ‘‘ सुरवातीला गंमत म्हणून मित्रांसोबत हुक्का पॉर्लरमध्ये जात होता. तेथे हुक्का ओढणाऱ्या मुलींचे आकर्षण वाटत होते. हुक्क्यामध्ये गांजा, ब्राऊनशुगर टाकले जात होते. व्यसनाधिन झाल्यानंतर ‘विड्रॉल’अवस्था झाली होती. काय करतो, काय बोलतो याचे भान राहत नव्हते. पालकांनी मला व्यसनमुक्ती केंद्रात टाकल्यामुळे आता थोडे बरे वाटत आहे.’
’ – राहुल ( नाव बदलले आहे) संगणक अभियंता

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...