
ॲड. दीपक शंकरराव सावंत, बी.एस्सी. एल.एल.बी.
ॲड. दीपक शंकरराव सावंत, स्वातंत्र्यसैनिक आणि कामगार नेते शंकरराव सावंत यांचे सुपुत्र, यांनी कोल्हापूर येथे
शिक्षण घेतले असून बी.एस्सी. व एल.एल.बी. (स्पेशल) पदव्या संपादन केल्या आहेत. कारकीर्दीची सुरुवात मिरज
मेडिकल कॉलेजमध्ये लायब्ररी असिस्टंट म्हणून झाली, त्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेच्या ऑक्ट्रॉय विभागात
क्लार्क म्हणून कार्यरत असताना एल.एस.जी.डी. परीक्षेत संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक मिळवला. एमपीएससीद्वारे
१९८५ मध्ये पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयात पीएसआय म्हणून निवड होऊन पहिली पोस्टिंग दहिसर पोलीस ठाण्यात
झाली. पहिल्याच पोस्टिंगमध्ये मुंबईतील सर्वांत तरुण डिटेक्शन ऑफिसर ठरण्याचा मान त्यांना मिळाला, जो
आजतागायत कोणी मोडलेला नाही.
मुंबईतील १८ वर्षांच्या सेवेत एसपीजी, वाकोला पोलीस ठाणे, रीजनल फॉरेनर रजिस्ट्रेशन ऑफिस, एसबी-२ सीआयडी
, विमानतळ इमिग्रेशन, राज्य पोलीस नियंत्रण कक्ष अशा विविध ठिकाणी काम करताना अनेक गुन्ह्यांचा यशस्वी
तपास करून परदेशी गुन्हेगारांना देशाबाहेर पाठवणे किंवा त्यांच्यावर कारवाई करणे अशी उल्लेखनीय कामगिरी त्यांनी
बजावली. १९९२-९३ च्या दंगलीदरम्यान कलिना येथे बीट ऑफिसर म्हणून कार्य करताना दोन महिन्यांच्या अथक
प्रयत्नांमुळे एकही सांप्रदायिक घटना घडली नाही.
सातारा जिल्ह्यात डीएसपी मीरा बोरवणकर यांच्या रीडर म्हणून आणि वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून काम
करताना संवेदनशील पांडेवाडी दरोडा प्रकरणातील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा तसेच मालखरेदी करणाऱ्या
सोनाराला १० वर्षांची शिक्षा मिळवून दिली. सीआयडी सांगली येथे कार्यरत असताना मिरज मिड डे मिल घोटाळा,
बेदाणा कर्ज फसवणूक यांसारख्या राजकीय दबावाखालील संवेदनशील प्रकरणांचा यशस्वी तपास करून आरोपपत्र
दाखल केले. यानंतर मुंबईत पुन्हा बदली होऊन यलो गेट पोलीस ठाण्यात डिझेल घोटाळा उघडकीस आणून दोन
जहाजे जप्त केली व नऊ आरोपींवर कारवाई केली.
बार्शी पोलीस ठाण्यात राजकीय दबावाला न जुमानता कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखली. येरवडा पोलीस ठाण्यात
कार्यरत असताना अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करून आरोपींना शिक्षा मिळवून दिली. निवृत्तीनंतरही "नयाना पुजारी"
बलात्कार-खून प्रकरणात वैयक्तिक लक्ष ठेवून ३ आरोपींना फाशीची शिक्षा मिळवून दिली, त्यासाठी २१६ दिवस
न्यायालयीन उपस्थिती व २८ दिवस न्यायालयीन उलट तपासणी केली. २०१४ साली स्वेच्छा निवृत्ती घेऊन "अरुनाई
लीगल कन्सल्टन्सी सर्व्हिसेस" या माध्यमातून नागरी व फौजदारी वाद, फसवणूक तपास, सायबर गुन्हे, वैवाहिक वाद,
वसीयतपत्र, भेटपत्र, करारनामे, तसेच करार विषयक वाद यांचे सल्ला व मार्गदर्शन सुरू केले.
त्यांच्या कठोर परिश्रम, निडर तपासशैली, कायद्यावरील निष्ठा आणि समाजसेवेच्या कार्यामुळे ॲड. दीपक सावंत यांचे
नाव पोलिस दल आणि न्यायव्यवस्थेत आदराने घेतले जाते. या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन दैनिक महा मेट्रो तर्फे
त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.