लेखक-दिग्दर्शक शाहानवाज शेख यांचा ऐतिहासिक टप्पा :
भारतात नवीन लॉन्च झालेल्या कॅनन EOS C400 कॅमेऱ्यावर चित्रपट शूट करणारे पहिले दिग्दर्शक
पुणे (सासवड ): लेखक-दिग्दर्शक शाहानवाज शेख यांनी भारतात नुकत्याच लॉन्च झालेल्या कॅनन EOS सिनेमा सिस्टीम C400 या अत्याधुनिक कॅमेऱ्यावर त्यांच्या आगामी चित्रपट लक्ष्मी चे शूटिंग करून एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. भारतात या कॅमेऱ्यावर चित्रपट शूट करणारे ते पहिलेच दिग्दर्शक ठरले आहेत.
या ऐतिहासिक प्रकल्पाला कॅनन कंपनीने देखील मान्यता दिली असून, ड्रीम क्राफ्ट फिल्म्स आणि शेख यांच्या लक्ष्मी चित्रपटाच्या सामाजिक कथेला सन्मान देत त्यांनी या चित्रपटासाठी अधिकृत स्पॉन्सरशिप दिली आहे.
चित्रपटाचे शूटिंग सासवड परिसरातील निसर्गरम्य डोंगराळ भाग, एस.टी. स्टँड, पुरातन मंदिर आणि पोलिस स्टेशन अशा ठिकाणी पार पडले. या चित्रपटाचे निर्माता एम अँड एम नितीन चंदन असून, शान फिल्म्स चे शब्बीर पुनावाला हे ऑफिशियल पार्टनर म्हणून जोडले गेले आहेत.
चित्रपटात प्रमुख भूमिका दक्षा कोळगावे, किशोर निलेवाड, आसावरी कुलकर्णी, धीरज बिडवे , सिया चोबे, सोमनाथ कांबळे, डॉ. भावना रणशूर-संचेती, सुखदा तारकुंडे, अर्चना थिटे, क्षितिज नवले, रोहित काळे, आणि बालकलाकार नक्षत्रा गायकवाड यांनी साकारल्या आहेत.
तांत्रिक बाजूस हातभार लावणाऱ्या टीममध्ये DOP हैदर अली पुनावाला, फोकस पुलर सिकंदर खान, कॅमेरा असिस्टंट अम्मार पुनावाला, जेम्स पग्गी, मेकअप आर्टिस्ट मंगेश गायकवाड, साउंड आर्टिस्ट विकी मोरे, कॉस्ट्यूम डायरेक्टर कोमल जावीर, असिस्टंट योगेश चव्हाण, फोटोग्राफर चंद्रकांत देवघरे, प्रोडक्शन मॅनेजर प्रियांका मेश्राम, आर्ट डायरेक्टर निशांत कुमार शर्मा (सारथी पिक्सल), कास्टिंग डायरेक्टर सुमुख टोरो (सुमुख फिल्म्स), प्रोडक्शन मॅनेजमेंट टीम गोविंद मेखले, अशोक बेंबडे आणि इतर लाईट टीम यांचा समावेश आहे.
‘लक्ष्मी’ हा चित्रपट एक संवेदनशील सामाजिक विषय मांडणारा आहे आणि लवकरच वेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, अशी माहिती लेखक-दिग्दर्शक शाहानवाज शेख यांनी दिली.