राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रकल्पात पुणे शहराचा समावेश

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रकल्पात पुणे शहराचा समावेश

‘शहरी पुर जोखिम व्यवस्थापन’ ( युएफआरएम) अंतर्गत शहराला मिळाले २५० कोटी रूपये ; चार हजार प्रशिक्षित मनुष्यबळ केवळ कागदावर

रेनगेज स्टेशन, ‘फ्लडसेंसर’ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, वॉटर व मडपंप खरेदी कागदावर

पुणे: राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ( एनडीएमए) या प्रकल्पा अंतर्गत देशातील सात शहरांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई, चेन्नई, कोलकत्ता, अहमदाबाद, बंगलूरु, हैद्राबाद आणि पुणे या शहरांचा समावेश आहे. अर्बन फ्लड रिस्क मॅनेजमेंट ( युएफआरएम) प्रकल्पा अंतर्गत पुणे शहराकरीता पंधराव्या वित्त आयोगांर्तगत (सन २०२१-२०२२ ते २०२५-२०२६) पर्यंत प्रत्येक वर्षा करिता ५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पा अंतर्गत अल्प व दिर्घ मुदतीचे स्ट्रक्चरल व नॉन स्ट्रक्चरल उपायोजना करण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. मात्र, नुकतच्या झालेल्या पावसानंतर पुणे शहरातील पुर स्थितीत महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभार समोर आला. त्यामुळे भविष्यात मोठ्या पावसामुळे पुरस्थिती उद्भवल्यास मालमत्तेच्या नुकसानासोबतच जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) या प्रकल्पांर्तगत पुणे शहराचा समावेश आहे. अर्बन फ्लड रिस्क मॅनेजमेंट ( युएमआरएम) प्रकल्पा अंतर्गत पुणे शहरा करिता पंधराव्या वित्त आयोगांतर्गत २०२०- २०२१ पासून प्रत्येक वर्षांला पन्नास कोटी रूपयांचा निधी मिळत आहे. या निधी मधून महापालिकेने अल्प व दिर्घ मुदतीचे स्ट्रक्चरल व नॉन स्ट्रक्चरल उपायोजना करणे अपेक्षित होते. ‘युएमआएम’ अंतर्गत मिळालेल्या २८६ कोटी ७० लाख रूपयांच्या आराखड्यास राष्ट्रीय उप समिती व कार्यकारी समितीने मान्यता देखील दिली होती.
पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये आपत्ती व्यवस्थापन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रात सेवकांची चौवीस तास नेमणूक करण्यात आलेली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग मार्फत पुणे महापालिकेतील विविध विभाग, खात्यातील सेवक, कर्मचारी यांचे करिता जनजागृती, प्रशिक्षण, क्षमता व बांधणी आराखडा तयार करण्याचे नियोजन होते.

‘‘ पुणे महापालिका राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था ( एनआयडीएम) शहराची आपत्ती आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगतात, मात्र, प्रत्यक्षात हा आराखडा पावसाळा संपल्यानंतर होणार का ? ’’
– विजय शिवले, सुराज्य सर्वांगिण विकास संस्था, पुणे, चौकट
आपत्ती व्यवस्थापन केंद्रा अंतर्गत चार हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
आपत्ती व्यवस्थापन केंद्रांअंतर्गत पुणे महापालिकेच्या पंधरा महापालिका सहायक आयुक्त कार्यालयांसह पथ, मलनि:सारण, घरपाडी, विद्युत, पाणी पुरवठा, उद्यान, अग्निशमन, सुरक्षा, शिक्षण, आरोग्य अशा विभागातील तब्बल दोन हजार सेवकांचे गेल्या 2 वर्षी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले. यावर्षी देखील दोन हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. हे सर्व कर्मचारी शहरातील पंधरा महापालिका सहाय्यक आयुक्त स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील नियंत्रण कक्षाचे संचलनाचे करणार होते. मात्र, नियंत्रण कक्षातील दूरध्वनीच बंद असल्याचा अनुभव अनेक नागरिकांना आला.रेनगेज स्टेशन उपकरणे, फ्लड सेंसरच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी कागदावर
पुणे शहराकरिता आवश्‍यक रेनगेज स्टेशन, स्मार्ट सिटी अंतर्गत फ्लड सेंसरच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची खरेदी, वॉटर व मडपंप खरेदी करण्यार असल्याचे महापालिकेच्या २०२४-२०२५ च्या अंदाजपत्रकात उल्लेख hoto.मात्र, ही खरेदी कागदावरच आहे की खरेदी केली याचे उत्तर मात्र, गुलदस्त्यात आहे.

‘‘ पुणे शहरात पन्नास ठिकाणी फ्लड सेंसर बसविण्यात आले आहेत. पुणे शहर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत महत्त्वाच्या वस्तूंची व उपकरणांची खरेदी केली आहे.’’
– गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख, पुणे महापालिका

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...