अश्लील फोटो व व्हीडीओ काढून महिलेवर लैगिंक अत्याचार करणाऱ्या आरोपीला त्याच्या पत्नीसह अटक
पुणे : आंबेगाव येथे दीड वर्षीपूर्वी एका फिर्यादी महिलेने आरोपींकडुन दोन लाख रुपये दरमहा पाच टक्के व्याजाने घेतले होते. महिलेने तीन लाख ६० हजार रुपये परत दिले. तरी देखील आरोपींनी महिलेकडे आणखीन रक्कमेची मागणी केली. ती रक्कम न दिल्याने फिर्यादी यांना त्रास देवुन आरोपी प्रताप रमेश जाधव याने फिर्यादी यांचेवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केले. फिर्यादी यांचे व्हीडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला त्याच्या पत्नीसह पोलीसानी अटक केले.
गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये एका महिलेने बारामती ‘एमआयडीसी’ मधील एका उद्योजकाविरुध्द गुन्हा दाखल केला होता . या गुन्हयामध्ये आरोपीस जामीन मिळु नये म्हणुन फिर्यादी यांना महिला आरोपी व इतरानी त्या उद्योजकावर खोटा गुन्हा दाखल करण्यास प्रवृत्त केले. गुन्हा दाखल केल्यास २० ते २५ लाख रूपये व बारामती येथील एक प्लॅट नावावर करून देण्याचे आमिष दाखविले. मात्र फिर्यादी महिलेने नकार दिले त्यामुळे आरोपींनी यांना जिवे मारण्याची धमकी दिले. तसेच त्यांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून उलट त्यांचेकडेच दहा लाख रू.ची खंडणी मागितली. महिला आरोपी हिने अनेक वेळा उच्चभ्रु, प्रतिष्ठित व्यक्तींना गुन्हयात अडकवण्याची धमकी देवून, ब्लॅकमेल करून, त्यांचेकडून खंडणी स्वरूपात फिर्यादी यांचे मार्फतीने पैसे स्विकारलेले आहेत. भारती विद्यापीठ पोलीस संबधीतांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे .
आरोपी प्रताप रमेश जाधव ( वय ४५ वर्षे, रा. भिंताडेनगर, राघवनगर, आंबेगाव) , पल्लवी प्रताप जाधव ( वय २८ वर्षे, रा. फ्लॅट नं. ९०७, इ १ निर्माण विवा, भिंताडेनगर, राघवनगर आंबेगाव) यांना अटक करण्यात आले आहे. आरोपी महिला ही उच्चभ्रु, प्रतिष्ठीत व्यक्तींना त्यांचे जाळयात अडकावुन त्यांचे सोबत फोटो काढुन, पुढे गुन्हयातील सर्व आरोपी हे व्यक्तींना गुन्हयात अडकाविण्याची धमकी देवुन, ब्लॅकमेल करून, त्यांचेकडून खंडणी स्वरुपात मोठी रक्कम घेत असत .
ही कामगिरी पश्चिम प्रादेशीक विभागाचे अपर पोलीस आयुकत राजेश बनसोडे, परिमंडळ दोनचे पोलीस उप आयुक्त मिलींद मोहीते, सहाय्यक पोलीस आयुक्त, . राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठाचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सपोनि स्नेहल थोरात, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, मंगेश गायकवाड, किरण साबळे, अभिनय चौधरी, संदीप आगळे, सागर बोरगे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, मितेश चोरमोले यांच्या पथकाने केली.