कैद्यांकडून चालवली जात आहे गोशाळा

कैद्यांकडून चालवली जात आहे देशी गोवंश गोशाळा
येरवडा खुल्या कारागृहातील बंदी देशी गोवंश जतन व संवर्धन
पुणे : येरवडा खुल्या कारागृहातील बंदी देशी गोवंश जतन व संवर्धन करीत आहेत. येरवडा खुले जिल्हा कारागृह येथे बंद्यांना रोजगार , प्रशिक्षण व पुनर्वसन या उद्देशाने ७० देशी गायींचे संगोपन केले जात आहे.कारागृहातील हा प्रयोग उत्तम आहे . कारागृहातून बंदी सुटल्यानंतर त्यांना राज्यातील गोशाळेत प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली जाऊ शकते असे महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी सांगितले.
येरवडा खुले जिल्हा कारागृह येथे शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिनानिमित्त मुंदडा बोलत होते. यावेळी खुल्या कारागृहाचे अधिक्षक अनिल खामकर, डॅा नितीन मार्केडेय, संजय भोसले, डॅा मंजूषा पुंडलिक , पशुधन विकास अधिकारी आशिष पवार, डॅा संगिता पांडे, वरिष्ठ तुरूंग अधिकारी नागेश कांबळे आणि बंदी उपस्थित होते.
कार्यक्रमात देशी गाईचे पूजन करण्यात आले

. यावेळी मुंदडा म्हणाले , ” येरवडा खुल्या कारागृहातील बंदी गोशाळा चांगल्या प्रकारे चालत आहेत. हे राज्यातील गोशाळा प्रशिक्षण केंद्राचे मॉडेल बनेल यात काही शंका नाही. सरकारकडून येरवडा खुल्या कारागृहातील गोशाळेला मदत केली जाईल. ”
येरवडा खुले जिल्हा कारागृह येथे बंद्यांना रोजगार , प्रशिक्षण व पुनर्वसन या उद्देशाने ७० देशी गायींचे संगोपन केले जात आहे. दररोज कारागृहास ४० लिटर शुद्ध देशी गायीचे दुध मिळते. यासह कारागृह शेती करीता शेणखत मिळते. गेल्या वर्षी कारागृह शेतीतून फळभाज्या,पालेभाज्या व धान्य पिकामधून नऊ लाख रूपयांचा निव्वळ नफा मिळाल्याचे कृषी अधिकारी सुधीर गांगर्डे यांनी सांगितले .

https://youtu.be/L5ZNJ1_seqI

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...