ज्येष्ठ महिलेची जागा बळकावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

सौजन्य चॅट जिभली प्रातिनिधिक चित्र

ज्येष्ठ महिलेची जागा बळकावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
जाऊ , सूनेवर होणार गुन्हा दाखल

पुणे : वडगावशेरीतील येथील ज्येष्ठ महिलेची तब्बल साडे अकरा हजार चौरस फुटाची जागा जाऊ , सून ,व वकिल असलेल्या नातवाने गिळंकृत केली. स्वतःच्या जागेवर सीमाभिंत व कोणतेही बांधकाम करू नये अशी पोलिसांनी तंबी दिल्याने जेष्ठ महिला हवालदिल झाल्या. गुन्हा दाखल न करण्यासाठी अतिवरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक पोलीसांना बजावल्यामुळे गुन्हा दाखल झाला नव्हता. अखेर ज्येष्ठ महिलेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने संपूर्ण प्रकरण बारकाईने पाहून जागा बळकावणा-यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश चंदननगर पोलीस ठाण्याला दिले आहेत.

शहरातील जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे अनाधिकृतपणे जागा बळकविण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यासाठी पोलिसांची सुद्धा मदत घेण्यात येत आहे. अशीच घटना वडगावशेरी येथील सर्वे नंबर ५१/१ मधील प्लॉट नंबर ५५,५६ व ६९ हि घरकुल सोसायटील साडेअकरा हजार चौरस फुटाची जागा तीस वर्षांपूर्वी शहरातील एका व्यवसायिकाने वाहिनीकडून विकत घेतली होती. ही जागा वहिणीची असल्याने त्यांनी त्यावेळी मिळालेल्या पैशात प्राप्तीकर सुद्धा भरला होता. व्यवसायिकाने जागा पत्नीच्या नावे केली. मात्र, जागेची किंमत वाढल्याने मूळ मालकाने जागेवर आपला दावा केला. ही आपलीच जागा असल्याचे सांगून संबंधितांनी पोलिसांची मदत घेऊन सध्याच्या जागा मालकिणीलाच मानसिक व शारिरीक त्रास दिला .

” गेल्या वर्षी अर्थात ६ जानेवारी २०२४ मध्ये कासीम शेख यांनी येऊन सांगितले कि संबधीत प्लॉट हे सुशीलादेवी तालेरा , सोना तालेरा यांनी अवनी रिअल्टर्स तर्फे भागीदार पृथ्वीराज प्रकाश सोळंके यांना कॉन्व्हेन्स डीड केले आहे, त्यामुळे तिन्ही प्लॉटचा ताबा घेतला आहे. याचा मला धक्का बसला. मला न कळवता माझी जाऊ , सून यांनी माजी प्रॉपर्टी तिसऱ्याच व्यक्तीला म्हणजे अवनी रिअल्टर्स ला नोंदणीकृत करारनाम्याने विकली आहे. मात्र न्यायालयाने माझी फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यामुळे मला न्याय मिळेल .””
– सुमनदेवी तालेरा , पीडित ज्येष्ठ महिला

तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यानी कारवाईसाठी मागितली होती परवानगी

चंदननगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी वडगावशेरी येथील सर्वे नंबर ५१/१ मधील प्लॉट नंबर ५५,५६ व ६९ हि घरकुल सोसायटील साडेअकरा हजार चौरस फुटाची ज्येष्ठ महिलेची जागा बळकावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा अहवाल तयार केला होतो. त्याची परवानगी तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांचा मार्फत तत्कालीन पोलीस उपायुक्त विजय मगर यांच्याकडे पाठवले होते. त्यानंतर काय झाले हे मात्र गूढ कायम आहे. तब्बल पावणे दोन वर्षा नंतर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल होत आहे. मात्र दरम्यान ज्येष्ठ महिलेला जागा मिळवण्यासाठी शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास झाला त्याची भरपाई कशी होणार हा प्रश्न आहे.

जागा बळकावण्यात पोलीस, राजकीय दबाव आणि गुंडगिरीचा वापर
ज्येष्ठ महिलेची जागा बळकावण्यासाटी सुरवातीला पैसे देऊन गुंडांचा वापर , त्यानंतर हि जागा चक्क आमदार प्रकाश सोळंके यांच्या मुलाला अर्थात पृथ्वीराज सोळंके यांच्या अवनी रिअल्टर्स या फर्म ला विकली. या बेकायदेशीर विक्री बाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून अति वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचा हस्तक्षेप , जेष्ठ महिलेचा वकील असलेल्या नातू कायद्याचा धाक दाखवत आम्ही कसे योग्य आहोत हे सांगत जागा बळकावण्यासाठी एक प्रकारे मदतच केली.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...