
पुणे पोलीसांकडून राजस्थानमध्ये अंमली पदार्थाची तस्करी करणारी टोळी उध्वस्त
चार कोटी २७ लाख रुपयांचा सुमारे दोन किलो ग्रॅम मेफॅड्रॉन (एम.डी) जप्त तर सहा आरोपींना अटक.
पुणे : पुणे पोलीसांनी थेट राजस्थानमध्ये जाऊन अंमली पदार्थाची तस्करी करणारी टोळी उध्वस्त केली. त्यांच्याकडून तब्बल चार कोटी २७ लाख रुपयांचा सुमारे दोन किलो ग्रॅम मेफॅड्रॉन (एम.डी) जप्त केले तर सहा आरोपींना जेरबंद केल्याची माहिती पत्रकार परिषेदेत पोलीसांनी दिली.
खराडी येथील ईहॉन फेज दोन जवळ ३ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेचारच्या सुरामरास दोन व्यक्ती एका पांढ-या रंगाचे कार सह थांबले होते. पोलीसांनी त्यांची चौकशी केल्यानंतर कारमधुन २७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, व साहित्य असे किं रु १२ लाख ४१ हजार रुपये मिळाले होते. त्यांच्याविरुध्द खराडी पोलीस ठाण्यात ‘एनडीपीएस’ कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासादरम्यान परिमंडळ सातचे पोलीस उप आयुक्त सोमय मुंडे यांनी सदर गुन्हयाचे घटनास्थळी भेट दिली होती. या गुन्हयातील जप्त मुददेमाल मेफॅड्रॉन या अंमली पदार्थाचे मुख्य रॅकेटचे जाळे उघड करण्याबाबत मार्गदशन करुन सुचना दिल्या होत्या. त्यानुसार खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उप निरीक्षक राहुल कोळपे व दोन तपासी पथके तयार करुन त्यांना अंमली पदार्थाशी निगडीत व्यक्तीचा शोध करणे बाबत सुचना दिल्या होत्या.
गुन्हयाच्या तपासामध्ये अटक करण्यात आलेले दोन आरोपी मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित ( वय २८ वर्षे, रा. वाघोली) , हरीष सुजनाराम देवासी ( वय २२ वर्षे, रा. वाघोली) या दोन्ही आरोपींकडे पोलीस कोठडीत कौशल्यपुर्ण तपास केला. त्यावेळी दोन्ही आरोपी हे जिल्हा जोधपुर ( राजस्थान ) येथील मुळचे रहिवासी असल्याचे निदर्शनास आले होते . ते दोघेजण एमडी व्यवसायात गेल्या वर्षभरापासुन सक्रिय होते. ते एमडी हा अंमली पदार्थ ते राजस्थान येथील व्यक्तीकडून मागणीकरुन अंमली पदार्थाचा पुणे परिसरात व्यवसाय करीत असल्याचे तपासात उघड झाले.
पोलीस कोठडीत आरोपी मोतीसिंह राजपुरोहित याचेकडे केलेल्या तपासात योगेश ऊर्फ मनीष बाबुराम बिष्णोई हा राजस्थान येथुन एमडी हा अंमली पदार्थ त्यास विक्री करण्यास येणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती . वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उप निरीक्षक राहुल कोळपे व तपास पथक अंमलदार पोलीस अंमलदार श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, सचिन पाटील, श्रीकांत कोद्रे, तांत्रिक विश्लेषक सुरज जाधव यांनी संबधित व्यक्तीला वाघोली परिसरातुन सापळा रचुन ताब्यात घेतले होते.
त्याचेकडुन एकुण १५१ ग्रॅम, किं. अशी एकुण ३० लाख २८ हजार एवढा मुददेमाल हस्तगत केला. व एम डी विक्री करण्यास राजस्थान येथुन येणारा योगेश ऊर्फ मनीष बाबुराम बिष्णोई ( वय-३० वर्षे, रा- लोडता हरीदास शोता) यास नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. त्याचाकडे अधिक तपास केला असता, त्याचे सोबत राजस्थान येथुन पुणे परिसरात अंमली पदार्थाची विक्री करण्यास येणारा त्याचा मावस भाउ ( सचिन ऊर्फ एस के रमेशकुमार बिष्णोई ( वय २० वर्षे रा पल्ली खिलोरीता. लोहावट, जि जोतपुर राज्य, राजस्थान ) यास तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक तपास करुन त्यास हडपसर, मुंढवा परिसरातुन रात्रीच्या वेळी ताब्यात घेतले. त्याचेकडुन एम डी पदार्थ विक्री करुन जवळ बाळगलेली रोख रक्कम रु. ४ लाख ६५ हजार एक अॅपल मोबाईल फोन किं. ४० हजार अशी रक्कम हस्तगत करण्यात आली.
त्याने मांजरी बुदुक येथे राहणारा अमित सुनिल घुले ( वय ४० वर्षे ) यास एम डी या अंमली पदार्थविक्री केल्याची कबुली दिली . तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अमित सुनिल घुले ( वय ४० वर्षे, रा वृंदावन कॉलनी, बेल्हेकर वस्ती, मांजरी बु/) यास त्याची आलिशान मोटारीसह ताब्यात घेतले. मोटारीसह एकुण ३९८ ग्रॅम एम डी, किं.रु. ७९ लाख ६० हजार व दोन मोबाईल फोन अशी एकुण एक कोटी दोन लाख ४० हजार एवढी मालमत्ता पंचनाम्याने जप्त करुन आरोपीस अटक करण्यात आली.
आरोपींकडे कौशल्यपुर्ण तपास करुन त्यांचा संपर्कातील एमडी अंमली पदार्थ मुख्य वितरक रतनलाल किष्णाराम जाठ ( वय २० वर्षे रा बलदेवनगर, बालोतरा ) यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन एकुण १३८४ ग्रॅम, मेफॅड्रॉन दोन कोटी शहात्तर लाख ऐंशी हजार रुपये ऐवज हस्तगत करण्यात आले. राजस्थान येथे तपासा दरम्यान अंमली पदार्थाच्या रॅकेटमध्ये सक्रिय असणारा व पुणे शहरातुन फरार असणारा आरोपी रामकरण जाट ऊर्फ चौधरी ऊर्फ सियाग ( रा कपोरीया ओसीया, जिल्हा जोधपुर ) यास अंमली पदार्थविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड व त्यांचे पथक यांनी अटक आरोपीतांकडून एकुण १९६०ग्रॅम, मेफॅड्रॉन व आलिशान मोटार एकुण किंमत चार कोटी, सत्तावीस लाख, नऊ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला . या गुन्हयात एकुण सहा आरोपींना अटक करुन एम डी रॅकेटमध्ये सक्रिय असणारी टोळी उध्वस्त करण्याची मोलाची कामगिरी केली गुन्हयाचा पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे हे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रभात रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त ( पुर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, परिमंडळ सातचे पोलीस उप आयुक्त सोमय मुंडे, पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (खराडी विभाग) प्रांजली सोनावणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, प्रभारी पोलीस निरीक्षक (अंमली पदार्थविरोधी पथक) पंडीत रेजितवाड, खराडी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी रविंद्र गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोळपे, पोलीस उप निरीक्षक व तपास पथकातील पोलीस अंमलदार श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, स चिन पाटील, सुरेंद्र साबळे, निलम कर्पे, साहेबराव गुंडाळे, श्रीकांत कोद्रे, तांत्रिक विश्लेषक सुरज जाधव, विलास केदारी, अशोक केदार, वाघोली पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार पांडुरंग माने, गहिनीनाथ बोयणे, सुनिल कुसाळकर, लोणीकंद पोलीस ठाण्याचे अमोल ढोणे, विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड, व पोलीस अंमलदार अंकुश जोगदंड, लालु क-हे, राहुल जोशी, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहा पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व पोलीस अंमलदार अमोल सोनवणे, संदीप जाधव, परिमंडळ सात चे कार्यालयाचे तांत्रिक विश्लेषक प्रविण गव्हाणे यांनी केली.