पोलीस कोठडीतून पळालेल्या आरोपीला अवघ्या दोन तासात केले जेरबंद

प्रातिनिधिक छायाचित्र चॅट जिपीटीच्या सौजन्याने

पोलीस कोठडीतून पळालेल्या आरोपीला अवघ्या दोन तासात केले जेरबंद

भूक लागल्यामुळे घरी आला ; पाळत ठेवलेल्या पोलिसांनी आरोपीला पकडले

पुणे : येरवडा पोलिस ठाण्यातील ‘लॉकअप’ मधून ‘पॉक्सो’ गुन्ह्यातील आरोपी पळून गेला होता. मात्र भूक लागल्यामुळे घरी आला आणि आधीच पाळतीवर असलेल्या पोलिसांनी आरोपीला पकडले. आरोपीला येरवडा पोलीसांनी अवघ्या दोन तासात जेरबंद केल्याची माहिती येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी दिली.
शैलेश राजू मोहिते (वय २०, रा. येरवडा) असे आरोपीचे नाव आहे. तो एका अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. त्याच्यावर डिसेंबर मध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. येरवडा पोलिसांनी त्याला नुकतेच अटक केले होते. आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. रविवारी रात्री लॉकअपमध्ये असताना आरोपीने चादर हवी असल्याचे कर्मचाऱ्याला सांगितले. कर्मचाऱ्याने शेजारी खोलीतून चादर घेण्यास आरोपीला सांगितले. त्यावेळी तो चादर आणण्यासाठी जातो म्हणून कोठडीच्या शौचालयाच्या खिडकीतून पळून गेला होता.
येरवडा पोलीसांनी आरोपीच्या घरी संपर्क करून माहिती दिली. तो आल्यास तत्काळ पोलीसांना कळविण्यास सांगितले. दरम्यान आरोपीने आईला फोन करून भुक लागल्याचे सांगितले . आईने मुलाला घरी जेवण करायला ये सांगून ; पोलीसांना मुलगा घरी येत असल्याचे कळविले. पाळत ठेवलेल्या पोलीसांनी आरोपीला घरी येताच जेरबंद केले. आरोपी मोहितेवर पोलीस कोठडीतून पळाल्यामुळे त्यावर गुन्हा दाखल केले आहे.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...