
पौर्णिमा गादिया समाजसेवेची अखंड ज्योत
पौर्णिमा गादिया या बीएचएसई आणि एम.एस.डब्ल्यू. (मास्टर इन सोशल वर्क) शिक्षण घेतलेल्या एक प्रतिष्ठित
समाजसेविका आहेत. त्यांचे शिक्षण सेंट फेलिक्स स्कूल आणि कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथे झाले. गेली
३२ वर्षे त्या अखंडपणे समाजसेवेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. १९९७ साली त्यांनी ‘दिशा इन्स्टिट्यूट’ ही सामाजिक संस्था
स्थापन केली आणि २०१० मध्ये ‘दिशा महिला विकास सहकारी सेवा सोसायटी’ची स्थापना करून महिलांच्या आर्थिक
आणि सामाजिक उन्नतीसाठी महत्त्वाचे कार्य सुरू केले. त्या आगा खान फाउंडेशनमध्ये १४ वर्षे कौन्सेलर म्हणून कार्यरत
राहिल्या असून, मुलांचे शिक्षण, बालहक्क, महिलांचे सबलीकरण यांसारख्या विविध उपक्रमांचे नेतृत्व त्यांनी केले आहे.
१९९१ पासून त्यांना समाजसेवेसाठी अनेक मानाचे पुरस्कार मिळाले असून, त्यामध्ये सावित्रीबाई मदन अवॉर्ड, इस्ला
अवॉर्ड, रोटरी क्लब ऑफ डाउन पुरस्कार, पॉल हॅरेस फेलोशिप, दादा कोंडके मेमोरियल फाउंडेशनचा समाज भूषण
पुरस्कार, नेहरू युवा पुरस्कार, वुमन इंटरनॅशनल ग्रुप पुरस्कार, युवा गौरव पुरस्कार, किरण बेदी यांच्या हस्ते सामाजिक
कार्यकर्ता पुरस्कार, साने गुरुजी साधना पुरस्कार, कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार, भैरवनाथ प्रतिष्ठान पुरस्कार,
भाग्यश्री सखी मंच पुरस्कार, रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड, गौतम लपती फाउंडेशनचा पहिला पुरस्कार, साई
प्रतिष्ठानचा आदर्श समाजसेविका पुरस्कार तसेच संज्योत पब्लिकेशन आणि पुणे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचा
महिला दिन पुरस्कार अशा अनेक सन्मानांचा समावेश आहे.
पौर्णिमा गादिया यांनी आयुष्यभर सामाजिक कार्याचा वसा जपत असंख्य महिलांचे आणि मुलांचे जीवन बदलले आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन दैनिक महा मेट्रो तर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले.