राजेंद्र खांदवे पाटील लोहगावचे बहुआयामी नेतृत्व

Dilip KurhadePoliticsPMCCityPune19/08/202538 Views

राजेंद्र खांदवे पाटील लोहगावचे बहुआयामी नेतृत्व

श्री. राजेंद्र खांदवे पाटील लोहगावचे सुपुत्र आणि संत तुकाराम महाराजांच्या आजोळ गावातील अभिमान असलेले
राजेंद्र खांदवे पाटील हे शांत, संयमी, अभ्यासू आणि मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. सामाजिक
प्रश्नांची अचूक जाण, उत्कृष्ट वक्तृत्व आणि राजकीय चातुर्य यामुळे त्यांनी स्थानिक तसेच पक्षीय पातळीवर ठसा
उमटवला आहे. हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष, जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष, वडगांवशेरी विधानसभा अध्यक्ष
आणि सध्या पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले आहे.

त्यांनी २००३-०४ मध्ये हवेली तालुकाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आणि कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या
कार्यकुशलतेमुळे पुन्हा एकदा त्या पदावर निवड झाली. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पहिल्या
नेमणुकीचे श्रेय स्वतः घेतले असले तरी, दुसऱ्या निवडीचे श्रेय त्यांच्या अपार मेहनतीला आणि कार्यक्षमतांना दिले.
सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांसारख्या नेत्यांनी अनेक वेळा सार्वजनिक मंचावर त्यांच्या कार्याची प्रशंसा केली
आहे.

या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन दैनिक महा मेट्रो तर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...