भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविदयालयातील डॉक्टरांचे काम न करता पगार
महापालिकेचे कोट्यवधी रुपये खर्च मात्र कमला नेहरू रुग्णालयाला काहीच उपयोग नाही
पुणे : पुणे महापालिकेचे मंगळवार पेठेत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविदयालयातील आहे. याच ठिकाणी महापालिकेचे कमला नेहरू रुग्णालय आहे. वाजपेयी वैद्यकीय महाविदयालयाचे पाचवे वर्ष आहे. या वैद्यकीय महाविदयालयात तब्बल ५०० विद्यार्थी आहेत. तर पाचशेच्या वर डॉक्टरां पासून ते शिपाई कर्मचारी आहेत. यातील काही विभागातील डॉक्टरांनी कमला नेहरू रुग्णालयालात रूग्णांना सेवा देणे अपेक्षित आहे. मात्र अनेक जण रूग्णालयात सेवाच दे नाहीत. त्यामुळे या डझनभर डॅाक्टरांचा पगार काढू नये असे पत्र कमला नेहरू रूग्णालयाचे अधिक्षक डॅा प्रशांत बोते यांनी महापालिकेच्या आरोग्यप्रमुखांना दिले आहे.
राज्यातील अनेक महापालिकेत वैद्यकीय महाविद्यालये होती. त्यामुळे पुणे महापालिकेच्या मालकीचे वैद्यकीय महाविद्यालय असावे अशी मागणी होत होती. त्यामुळे महापालिकेने अनेक वर्षांनंतर २०२० मध्ये भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविदयालय सुरू करण्यात आले. या वैद्यकीय महाविद्यालय पाचशेच्या वर पदे आहेत. तब्बल २२ विभाग आहेत. यातील चौदा विभागातील डॅाक्टरांनी शेजारीच असलेल्या कमला नेहरू रूग्णालयात रूग्णांना सेवा देणे अपेक्षित आहेत. मात्र अनेक डॅाक्टर नेहरू रूग्णालयात फिरकतच नाहीत. त्यामुळे बोते यांनी या डॅाक्टरांचा पगार काढू नका अशी विनंती आरोग्य प्रमुखांना केली आहे.
हा केवळ डॅाक्टरांचा प्रश्न नाही तर अनेकजण रूग्णालयात हजेरी लावून बाहेर पडतात. तज्ज्ञ डॅाक्टरांना दोन लाख, सहायक डॅाक्टरांना एक सव्वा लाख तर इतरांना साठ ते सत्तर हजार पगार आहे. मात्र काम काहीच नाही असा प्रकार आहे.यावर कोणीच ब्र काढत नसल्याचे दिसून येते.
” भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील काही डॅाक्टरांचा पगार थांबविले आहे. ही वस्तुस्थिती आहे. “
– डॅा सीमा प्रतिनिधी , अधिष्ठाता, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय , पुणे महापालिका
ना ओळख पत्र ना ॲप्रन
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात सध्या ४०० विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांची ओळख म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयाचे आयकार्ड व ॲप्रन आहे. मात्र अनेक विद्यार्थी ना ओळखपत्र गळ्यात घालतात ना अंगात ॲप्रन त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय गेल्यावर शिपाई , कर्मचारी , डॅाक्टर कि विद्यार्थी हे समजत नाही. अनेक विद्यार्थी तर महाविद्यालय फिरकतच नाहीत त्यामुळे यांच्याकडून रूग्ण सेवा लांबच राहिले.
कमला नेहरू रूग्णालयात ५० डॅाक्टर दिमतीला पण दुपारनंतर घरी
मंगळवार पेठेतील कमला नेहरू रूग्णालयात ५०पेक्षा डॅाक्टर रूग्णांच्या दिमतीला आहेतं मात्र अनेक डॅाक्टर दुपारीच घरी जातात. यावर त्यांच्यावर कारवाई अद्याप झाली नाही. विशेष बाब म्हणजे या डॅाक्टरांवर देखरेख व नियंत्रण करणारेच दुपारी तीन वाजताच महापालिकेत बैठक असल्याचे सांगून बाहेर पडतात. या बाबात महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॅा निना बोराडे यांनी संबंधितांना तंबी देऊन सुद्धा हा प्रकार थांबलेला नाही.