
मद्यपान करताना झालेल्या मारहाणीत एकाच खून
पोलीसानी अवघ्या दीड तासात आरोपीला केले जेरबंद ; लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याची कामगिरी
पुणे : येरवडा लक्ष्मीनगर येथे मद्यपान करताना शिवीगाळ केल्याचा राग आल्यामुळे एकाने मित्राच्या डोक्यात लाकडी दांड्याने मारले. या मारहाणीत माशक गजबक्ष वीजपुरे (वय ३०, रा. संतोष मित्र मंडळ , लक्ष्मीनगर ) याचा मृत्यू झाला. त्यामुळे घाबरलेला आरोपी गणेश वसंत शिंदे ( वय ३४, रा.आर. के. चौक , लक्ष्मीनगर , येरवडा) पळ काढला आरोपी गणेश शिंदेला दीड तासात पकडल्याची माहिती लक्ष्मीनगर पोलीस ठाणाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी सांगितले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम म्हणाले , ” गणेश शिंदे व माशक वीजपुरे एका ठिकाणी मद्यपान करीत होते. यावेळी वीजपुरे याने शिंदेला शिवीगाळ केली. याचा राग आल्यामुळे शिंदेने लाकडी दांड्याने वीजपुरेच्या डोक्यात मारले. त्यामुळे वीजपुरे खाली कोसळला. गेली अनेक वर्षांपासून मैत्री असल्यामुळे शिंदेने वीजपुरेला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. मात्र वीजपुरेचा आधीच मृत्यू झाला होता. घाबरलेल्या शिंदेने तेथून पळ काढला. आर.के चौकात एकजण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती मिळताच धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तपास पथके तयार करून आरोपीच्या शोधासाठी पाठिवले. ”
आरोपीकडे त्याच्या बहिणीचा मोबाईल होता. मोबाईल लोकेशन लक्ष्मीनगर मध्येच दाखवत होता. त्यामुळे कसून तपास सुरु ठेवला होता. दरम्यान दीडच तासात वीजपुरेला नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयाजवळ ताब्यात घेतले . विजापुरे व शिंदे गेली दहा वर्षांपासून मित्र होते. शिंदे रंगकाम करत होता तर विजापूरे केटरिंगचे काम करत होता अशी माहिती कदम यांनी दिली.
घटनास्थळी पूर्व विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील , परिमंडळ चार चे उपायुक्त चिलुमुला रजनीकांत , येरवडा सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या.
सहायक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार, पोलीस कॉन्स्टेबल भीमराव कांबळे, अक्षय शिंदे, अतुल जाधव, अमोल वायाळ, अमोल गायकवाड, दत्ता शिंदे, अजित वाघुले यांनी आरोपीला पकडण्यासाठी परिश्रम घेतले.