
राज्य कारागृह पश्चिम विभागीय क्रिडा स्पर्धा संपन्न
पुणे: महाराष्ट्र राज्य कारागृह पश्चिम विभागीय क्रिडा स्पर्धा सन २०२५-२०२६ चा दिमाखदार बक्षीस वितरण समारंभ नुकतेचा संपन्न झाला .शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आशियाई क्रिडा स्पर्धेमध्ये रौप्य पदक विजत्या (पॉवर लिफ्टींग) राष्ट्रीय वेट लिफ्टींग खेळाडू तथा कोल्हापूर जिल्हा क्रिडा अधिकारी विद्या रोहिदास शिरस यांचे हस्ते पार पाडला. स्पर्धेचा समारोप आणि यशस्वी खेळाडुंचा सन्मान करण्यात आला.
सुधारणा व पुनर्वसन हे कारागृह विभागाचे ब्रीद असुन कारागृहात कामकाज करताना अधिकारी व कर्मचारी यांना देखील ताण-तणाव निर्माण होत असतो, तसेच कारागृहाच्या दैनंदिन कामकाजातून विरंगुळा मिळावा व शारिरीक तसेच मानसिक आरोग्य सुदृढ राहुन संघ भावना निर्माण होण्याच्या उद्देशाने सदरच्या क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. क्रिडा स्पर्धा दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय येथील क्रिडागणावर आयोजित करण्यात आलेल्या होत्या. यामध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, उपमुख्यालय (सांगली सातारा, सोलापुर, कोल्हापूर, येरवडा खुले जिल्हा कारागृह, दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय संघाचे एकुण १३९ महिला व पुरुष खेळाडुंनी सहभाग नोंदविला. क्रिडा स्पर्धेमध्ये वैयक्तिक गटात १०० मी, २०० मी, ४०० मी, ८०० मी धावणे, रिले, गोळा फेक, कुस्ती, थाळी फेक, भाला फेक, लांबउडी, कराटे, १५०० मी चालणे, बॅटमिंटन तसेच सांघिक प्रकारात कबड्डी, व्हॉलिबॉल, रस्साखेच या क्रिडा प्रकाराचा समावेश करण्यात आला होता. क्रिडा स्पर्धेत नैपुण्य प्राप्त खेळाडुंची राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेकरिता निवड करण्यात येणार असल्याचे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले.
क्रिडा स्पर्धेत उत्कृष्ट पुरुष खेळाडु राजेंद्र कुंभार (कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह संघ) व उत्कृष्ट महिला खेळाडु छाया कोळेकर (मुख्यालय संघ) यांनी बहुमान पटकाविला. सर्वसाधारण विजेतेपद येरवडा मध्यवर्ती कारागृह, तर सर्वसाधारण उपविजेते पद कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाने पटाकाविले.
कारागृह उपमहानिरीक्षक ( प श्चिम विभाग) सुनिल एन ढमाळ यांनी प्रास्ताविक केले. कारागृह अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यामागचा हेतु विषद केला. विद्या शिरस म्हणाल्या की, “कारागृह प्रशासनातील व्यस्त आणि तणावपुर्ण कर्तव्यामधून वेळ काढुन खेळाकडे वळणे हे शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे, अशा स्पर्धामुळे कर्मच्या-यांमध्ये सांघिक भावना वाढीस लागते.”
क्रिडा स्पर्धा कारागृह उपमहानिरीक्षक ( पश्चिम विभाग) , प्राचार्य, दौ.जा.तु.अ.प्र.महाविद्यालय नितिन वायचळ यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आल्या.
कार्यक्रमास कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह अधीक्षक एन. जी. सावंत, येरवडा मध्यवर्ती कारागृह अति. अधीक्षक पल्लवी कदम , उप प्राचार्य तथा अति. अधीक्षक, दौ.जा.तु.अ.प्र.महाविद्यालय हरिभाऊ मिंड, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह अति. अधीक्षक विवेक झेंडे येरवडा खुले जिल्हा कारागृह अधीक्षक श्यामकांत शेडगे, सोलापूर जिल्हा कारागृह अधीक्षक एस. कुंभार, सांगली जिल्हा कारागृह अधीक्षक विजय कांबळे, दक्षता पथक पोलीस निरीक्षक विजय माने, सातारा जिल्हा कारागृह प्र. अधीक्षक टी. एस. निंबाळकर, कोल्हापूर (शहर) जिल्हा कारागृह प्र. अधीक्षक जठार , स्वतंत्रपुर खुली वसाहत आटपाडी प्र. संपर्क अधिकारी मधुकर चौधरी, कारागृह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
क्रिडा स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी नियुक्त असलेल्या सर्व समिती सदस्य पी बी उकरंडे , शैला वाघ, रविद्र दिघे, योगेश पाटील, शिक्षक एन. आर. शिंदे, शिक्षक, प्रल्हाद कुदळे, हवालदार ,कारागृह अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.