शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिमेत कारागृहे आघाडीवर

 शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिमेत कारागृहे आघाडीवर

पुणे :शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिम – दुसरा टप्पा” कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व महसुली विभागांमधील ४० विभागस्तरीय कार्यालयांच्या व सर्व जिल्ह्यांमधील ४२ जिल्हास्तरीय कार्यालयांसाठी वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जिवनमान, गुंतवणूकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर, इत्यादी दहा मुद्यांवर घेण्यात आलेला स्पर्धेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला.

              स्पर्धेमध्ये उपमहानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा विभागस्तरीय कार्यालयांमध्ये प्रथम क्रमांक- कारागृह उपमहानिरीक्षक कार्यालय,दक्षिण विभाग, भायखळा मुंबई-८ (कार्यालय प्रमुख- योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक), द्वितीय क्रमांक- कारागृह उपमहानिरीक्षक कार्यालय,नागपूर (कार्यालय प्रमुख-.डॉ. जालिंदर सुपेकर) व तृतीय क्रमांक- कारागृह उपमहानिरीक्षक कार्यालय, नाशिक (कार्यालय प्रमुख- .डॉ. जालिंदर सुपेकर). तसेच अधीक्षक, जिल्हा/मध्यवर्ती कारागृह या जिल्हास्तरीय कार्यालयांमध्ये प्रथम क्रमांक- अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह (कारागृह अधीक्षक-  सुनिल ढमाळ), द्वितीय क्रमांक विभागून लातूर जिल्हा कारागृह व ठाणे मध्यवर्ती कारागृह (लातूर कारागृह अधीक्षक- मा..लहू सांगळे व ठाणे मध्यवर्ती कारागृह अधीक्षक-  राणी भोसले), तृतीय क्रमांक नागपूर मध्यवर्ती कारागृह (कारागृह अधीक्षक-  वैभव आगे) या कार्यालयांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे.

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...