रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम

रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया (आठवले)  यांच्या वतीने भव्य समाजोपयोगी उपक्रम 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने पुणे रेल्वे स्थानक येथे रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया (आठवले), पुणे शहर यांच्या वतीने भव्य समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणावर नागरिकांसाठी विविध सेवा देण्यात आल्या. या उपक्रमांतर्गत ५००० पेक्षा अधिक पिंपळ, वड, तुळस, जास्वंद तसेच विविध फळझाडांची रोपे पीएमसी व एनप्लांट्स वृक्ष संवर्धन फाउंडेशन यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली व नागरिकांना मोफत वाटप करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम विशेष ठरला.

तसेच १०,००० पेक्षा अधिक अन्न पाकिटे, लाडू व पाणी बाटल्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून हजारो लोकांनी या स्टॉलला भेट दिली. या कार्यक्रमास रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये बाळासाहेब जनराव, निलेश रोकडे (अध्यक्ष – पर्यावरण विभाग), संजय सोनवणे, शाम सादफुले, महिपाल वाघमारे, जयदेव रांदिवे, उपमहापौर परशुराम वाडेकर तसेच पीएमसी गार्डन विभागाचे प्रमुख घोरपडे यांची उपस्थिती लाभली.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्टॉलला भेट देऊन रोप वितरणाच्या उपक्रमाचे कौतुक केले. पर्यावरणपूरक संकल्पना व समाजसेवेचा संगम पाहून त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले.

हा उपक्रम समाजसेवा आणि पर्यावरण जपणुकीबाबतची बांधिलकी दर्शवणारा असून, पुढील वर्षी या उपक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित पुस्तके वाटप करण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...