संस्कार भारती पश्चिम प्रांत पिंपरी चिंचवड समितीच्या वतीने अभिव्यक्ती आयोजन
सृजनाच्या आनंद कला महोत्सव २०२६
- पिंपरी : संस्कार भारती पश्चिम प्रांत पिंपरी चिंचवड त्या वतीने अभिव्यक्ती आयोजन करण्यात आले. शनिवारी सकाळी १० ते ११ उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आले. ११.१५ ते १२.३० ओजस हिरानी यांचे मंदिर स्थापत्य यावर व्याख्यान झाले. दुपारी ३.३० ते ५ नृत्यपंढरी ते आयोजन करण्यात आले .संध्याकाळी ५.४५ ते ६.१५ श्रध्दा हर्डीकर शिंदे (कथक नृत्य), संध्याकाळी ६.४५ ते ७.४५ डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांचे कथक नृत् झाले . रात्री ८ ते ९ पं. कैवल्यकुमार गुरव यांचे शास्त्रीय गायन झाले .
रविवार २६ एप्रिल २०२६ सकाळी १० ते ११ डॉ. भावार्थ देखणे यांचे बहुरूपी भारूड सादर केले जाणार आहे .सकाळी ११ ते १२ रंगमुद्रा थिएटर फाउंडेशन प्रस्तुत आठवणींचा गांव , दुपारी १२ ते १ महाराष्ट्राची लोककला , दुपारी ३.३० ते ४.३० स्वरांजली (आशा भोसले), दुपारी ४.३० ते ५ पं. सुधाकर चव्हाण, संध्याकाळी ६ ते ७ डॉ. संध्या पुरेचा आणि सहकारी भरतनाट्यम नृत्य सादर केले जाणार आहे.
संध्याकाळी ७ ते ७.४५ पद्मश्री पं. रोणू मजुमदार यांचे बासरी वादन , रात्रौ ८ ते ९ त्या तिघी , रात्रौ ९ वाजता वंदे मातरम् कार्यक्रमाची सांगता होणार आहे .
कार्यक्रम निगडी प्राधिकरण येथील ग.दि.माडगूळकर नाट्यगृहात होत आहेत . अभिव्यक्ती आयोजन डॉ. पं. नंदकिशोर कपोते (अध्यक्ष) सौ. लीना आढाव (सचिव) करीत आहेत.