
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी दिले आजीला तिच्या घराचा ताबा
लक्ष्मीनगर मध्ये सामाजिक सलोख्याचे दर्शन ; घराचा ताबा घेतलेल्या हि बेघर होऊन दिले नाही.
पुणे : येरवडा लक्ष्मीनगर येथील एका निराधार ज्येष्ठ महिलेच्या घरावर एकाने ताबा घेतला होता . याची फिर्याद घेऊन ज्येष्ठ महिला लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात गेल्या. मात्र सुरवातीला पोलीसानी त्यांना हुसकावून पाठिविले. एखाद्याला घरातून बाहेर काढणे व एखाद्याला घराचा ताबा देणे हे पोलीसांचे काम नाही असे पोलिसानी सांगितले गेले . मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र कदम यांनी हे प्रकरण संवेदनशीलतेने हाताळून ज्येष्ठ महिलेला त्यांचा घराचा ताबा तर दिलाच यासह त्यांचे घराचा ताबा घेतलेल्या हि बेघर होऊन दिले नाही.
पोलीसाच्या गणवेशातील माणुसकीचे दर्शन लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात नुकतेच दिसून आले . सुरेखा भोसले या ज्येष्ठ महिलेचे घर लक्ष्मीनगर येथील भिमक्रांती मित्र मंडळ चौकात होते. घर हे मोडकळीस आल्यामुळे भोसले नातेवाईकांकडे राहत होत्या. याचा गैरफायदा घेऊन बाबू चौधरी या व्यक्तीने घराचा बेकायदा ताबा घेतला होता. गेली अनेक दिवस भोसले घर मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या घरांचे उंबरे झिजवत होत्या. पोलीस हि दाद देत नव्हते.
दरम्यान हे प्रकरण लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी समजून घेतले. भोसले यांच्याकडे घराचे महापालिकेच्या ग व नी ची कर भरलेली पावती होतो. बाबुला घरातून काढायचे तर त्याला पत्नी, दोन मुलगे , एक मुलगी व आई असा परिवार होता. कदम यांनी एडवोकेट दिलीप कुऱ्हाडे यांचा सल्ला घेतला. त्यांनी बाबू चौधरीसुद्धा नुकसान नको अशी भूमिका घेत आपण लोकवर्गणीतून काही रक्कम चौधरीला दिले तर तो भोसले यांचे घर सोडून दुसरीकडे भाड्याने राहील व भोसले यांचे घर त्याना मिळेल हा मध्यम मार्ग काढला.
हि बाब समजताच आ र्थिक मदतीसाठी आजी- माजी नगरसेवक तसेच कार्यकर्ते पुढे आले. नगरसेवक ॲड. अविनाश साळवे,माजी नगरसेवक हनिफ शेख, माजी नगरसेवक किशोर विटकर, सामाजिक कार्यकर्ते अजय जानराव, जॉर्ज स्वामी, श्रीकांत ओझर्डेकर, सुनील लोखंडे, लतिफ माहुत, अन्वर पठाण, अहमद शेख, जमीर शेख, जयंत चव्हाण आदींनी आर्थिक मदत चौधरीला दिली. त्यामुळे चौधरी घर सोडण्यास तयार झाला आणि सुरेखा भोसले यांना त्यांचा हक्काचे घर मिळाले. हे प्रकरण
पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी संवेदनशीलपने हाताळले त्यामुळे परिसरात त्यांचे कौतूक होत आहे.