
उच्यपदस्थ अधिका-यांच्या लैंगिक छळाला कंटाळून पीएचडी करणा-या युवतीची आत्महत्या
भारतीय वनस्पती शास्त्र विभागाचे सहसंचालक डॉ. ए. बिन्नीयामीन शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडीत
पुणे : भोसरी येथील ‘पीएचडी’ करणा-या एका तीस वर्षीय युवतीने गाईडच्या लैंगिक शोषणाला कंटाळल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागाचे सहसंचालक डॅा. ए बिन्नीयामिन ( वय ५० वर्षे रा. धानोरी ) याला पोलीसांनी अटक केले असून न्यायालयाने त्याला शुक्रवार ( ता . १७) पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
पीएचडी करणा-या युवतीच्या आत्महत्येमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यामुळे उच्च शिक्षण घेणा-या विशेषतः पीएचडी करणा-या युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मार्गदर्शकच भक्षक होत असल्याचे दिसून येत
मृत्यू झालेल्या युवतीचे तिचे गाईड डॉ. ए. बिन्नीयामीन यांनी तीचे सोबत ऑगष्ट २०२५ पासुन ११ एप्रिल दुपारी १२/४५ वा. पर्यंत केलेल्या अनैतीक प्रकार, गैरवर्तन व मानसिक त्रासाला कंटाळुन तिने राहते घरी गळफास घेवुन आत्महत्या केली असल्याचे तिच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. डॉ. ए. बिन्नीयामीन याचे विरुध्द तक्रार दिल्याने गुन्हा दाखल केले आहे. अधिक तपास एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशनचे महिला पोलीस उपनिरीक्षक भिसे करीत आहे.
भारतीय वनस्पती सर्वेक्षण हे केद्र सरकारच्या आखत्यारित असलेला विभाग. या विभागात महाराष्ट्र , कर्नाटक व गोवा या राज्यातील वनस्पतीचा अभ्यास केला जातॊ. अतिशय दुर्मिळ आशा वनस्पतीचे जतन येथे केले जाते.
महाराष्ट्र, गौवा आणि कर्नाटक विविघ वनस्पतींनी समृध्द आहे. यातील अनेक वनस्पती दुर्मिळ आहेत. संशोधक आजही नवनवीन वनस्पतींच्या शोधात आहेत. भारतीय वनस्पती सर्वेक्षणकडे असलेल्या एक लाख १२ हजार वनस्पती ( हर्बेरियम) नमुन्यांचे डिजिटायझेशन केले आहे. त्यामुळे पुढील कित्येक शतकानंतरही वनस्पतींची संपुर्ण माहिती एक क्लिकमध्ये मिळू शकते.देशातील अतिशय महत्वाचे हा विभाग आहे. या ठिकाणी अनेक विधार्थी व विद्यार्थिनी संशोधनासाठी येत असतात.