रिक्षामध्ये विसरलेली महिलेच्या पर्सचा शोध घेऊन एक लाख किंमतीच्या वस्तू परत दिल्या

Dilip KurhadePuneCrime19/05/2025168 Views

रिक्षामध्ये विसरलेली महिलेच्या पर्सचा शोध घेऊन एक लाख ९ हजार रुपये किंमतीच्या वस्तू परत दिल्या

पुणे ः येरवडा सुभाषनगर येथील – सुहासिनी चंद्रकांत धोत्रे ( 45 वर्षे) सोमवारी दुपारी एक वाजता बँकेच्या कामा करिता रिक्षा मधून गाडीतळ, येरवडा येथे आलेल्या होत्या. रिक्षा सोडल्यानंतर बँकेतील काम झाल्यानंतर दीड वाजण्याच्या सुमारास त्यांना समजले की आपली पर्स रिक्षामध्ये विसरून गेली होती. त्यामध्ये सोन्याची चेन व रोख रक्कम असे एकूण एक लाख नऊ हजार रुपये किमतीच्या वस्तू होत्या.
संबंधीत महिला येरवडा पोलीस ठाण्यात आल्यानंतर सपोनी दिनेश पाटील, पोउनी प्रदीप सुर्वे, पोलीस अंमलदार अभिजीत कांबळे यांना भेटले.
त्यांनी रिक्षा चालकाला गुगल पे वरून पैसे दिले होते. सदर बाबत येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी दिली सूचनेप्रमाणे पथकाच्या अंमलदारांनी तात्काळ चौकशी करून, रिक्षा शोधून काढली व त्यामधील पर्स संबंधित महिलेला परत मिळवून दिली. त्यामधील वरील वर्णनाच्या सर्व वस्तू प्राप्त करून, त्या महिलेस परत देण्यात आलेले आहेत.

हि कामगिरी सपोनि दिनेश पाटिल,  पोउपनि प्रदिप सुर्वे, पोहवा तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, अभिजित कांबळे यांनी केली.

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...